अकोला, दि. ७ – मोठा गाजावाजा करून भव्य मोफत आरोग्य शिबिरात केवळ भाजपचा प्रचार करण्यासाठी हा स्टंट करण्यात आला असून कुठलाही विशेष उपचार करण्यात आला नसल्याची टिका वंचित बहुजन आघाडी मीडिया पॅनलिस्ट राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.
एकीकडे राज्यात विविध शासकीय रुग्णालये नागरिकांच्या मृत्यू सापळे बनले असून आज अकोल्यात मेडीकल कॉलेज आणि शासकीय रुग्णालये ह्यांचा वापर करून आज उपमुख्यमंत्री ह्यांना बोलवून भाजपची प्रचार स्टंट केला आहे. ज्या तपासण्या ओपीडी मध्ये करतात त्याच सामान्य तपासण्या ह्या शिबिरात डॉक्टर्सनी ह्या शिबिरात केल्यात. तेच काम ओपीडी मध्ये डॉक्टर करीत होते. कुठल्याही मोठ्या आजारा साठी ह्यात काहीही नव्हते. त्यामुळे नाहक शासकीय रुग्णालये आणि यंत्रणा वेठीस धरून भाजप विरोधात जिल्ह्यात रोष निर्माण झाला आहे. रुग्ण उपचार करण्या ऐवजी राजकीय नेते भाषणबाजी करीत असल्याने तपासणी साठी आलेले रुग्ण त्रस्त होते.
राज्यातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटर वर असताना सवंग प्रसिद्धीसाठी भाजपने आज चक्क शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय ह्याचा गैरवापर केला असल्याची टीका देखील राजेंद्र पातोडे ह्यांनी केला आहे.