ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या महासभेला विविध मान्यवर उपस्थित
मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक शेवटच्या भाषणानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिवाजी पार्क येथे “संविधान सन्मान महासभा” मुंबईत सुरू आहे.

या सभेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात जनसागर उसळला आहे. या महासभेत संविधानाचा जागर करण्यात येत आहे.

यावेळी महासभेला ॲड. प्रकाश आंबेडकर, भीमराव आंबेडकर, रेखाताई ठाकूर, अंजलीताई आंबेडकर, सुजात आंबेडकर तसेच मान्यवरांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या संविधान महासभेसाठी राज्यभरातून संविधानप्रेमी लाखोंच्या संख्येने उपस्थित आहेत.
सर्व मान्यवरांची भाषणं सुरू आहेत. लवकरच ॲड. बाळासाहेब आंबेडकर मार्गदर्शन करणार आहेत.
संविधान के सम्मान में VBA मैदान मे, “वंचित बहुजन आघाडीचा विजय असो”, बाळासाहेब आंबेडकर आगे बढो, हम तुम्हारे साथ है…संविधानाचा विजय असो, अशा घोषणा देण्यात येत आहेत.






