पनवेल : वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर अंतर्गत कळंबोली येथे झालेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात असंख्य तरुण कार्यकर्त्यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. या निमित्ताने कळंबोली विभागात वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
हा सोहळा पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड यांच्या आदेशानुसार आणि उपाध्यक्ष सतीश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमात तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कळंबोलीतील विविध प्रभागांत वंचित बहुजन आघाडीला मजबूत पर्याय म्हणून उभं करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या प्रसंगी पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड, उपाध्यक्ष सतीश अहिरे, महासचिव संतोष मुजमुले, महासचिव अविनाश अडागळे, प्रसिद्धी प्रमुख राहुल चव्हाण, प्रशिक्षक बाळासाहेब मेटांगे, भागुराम भेकरे, चंद्रकांत नवगिरे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि वंचित बहुजन आघाडीच्या तत्त्वज्ञानाचा परिचय करून दिला.
Mumbai : बाळासाहेब आंबेडकर यांची ठोके कुटुंबीयांना सांत्वनपर भेट
नवीन प्रवेशित कार्यकर्त्यांमध्ये संजय पंडित, विजय कुकुर, पूनम रंजवे, ॲड. सुनिता खंदारे, चेतन कारंडे, गणेश रंजवे, भगवान भालेराव, विश्वा रणखांबे, सतीश माने, नितीन पंडित, संतोष साळवे, शहाजी खरात, दत्ता सोकासने, सुरेश गजबे, नामदेव भालेराव, सचिन प्रधाने, शिवाजी प्रधाने, राष्ट्रपाल गायकवाड यांचा समावेश आहे.
या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे कळंबोली शहर विभागात वंचित बहुजन आघाडीचा पाया अधिक भक्कम झाला असून सामाजिक परिवर्तन, बहुजन ऐक्य आणि समतावादी समाजाच्या निर्मितीसाठी पक्षाचा झेंडा अधिक उंचावला गेला आहे.






