Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

महिला कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात संपन्न; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

mosami kewat by mosami kewat
November 3, 2025
in बातमी
0
महिला कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात संपन्न; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

महिला कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात संपन्न; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

नांदेड : जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील तळेगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महिला व कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

या मेळाव्यात आगामी निवडणुकांमध्ये प्रभावी प्रचारयंत्रणा उभारणी, पक्षाचे ध्येयधोरण आणि भूमिका जनतेपर्यंत पोहोचवणे, कार्यकर्त्यांची बूथनिहाय बांधणी, महिला सहभाग वाढविणे, तसेच सामाजिक आणि राजकीय परिस्थितीतील बदलांचा अभ्यास यावर सविस्तर चर्चा झाली.

https://youtu.be/9ljDW9bynbg?si=1dWILQsCOE0nB3f9

सुजात आंबेडकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, “वंचित बहुजन आघाडी ही फक्त राजकीय पक्ष नसून, सामाजिक न्याय, समानता आणि परिवर्तनाची चळवळ आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या परिसरात लोकांशी थेट संवाद साधून संविधानिक मूल्यांवर आधारित राजकारण जनतेपर्यंत
पोहोचवावे.”

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्रभर सुरू असलेल्या सुजात आंबेडकर यांच्या दौऱ्याचा हा एक भाग असून, या माध्यमातून निवडणूक पूर्वतयारी मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहे.

या वेळी मंचावर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ता कैलास वाघमारे, नांदेड जिल्हाध्यक्ष शिवा नरंगळे, प्रशांत इंगोले, श्याम कांबळे तसेच स्थानिक पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मेळाव्याच्या शेवटी कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा झेंडा उंचावण्याचा निर्धार केला.

Tags: MaharashtranandedPoliticalSujat Ambedkarsujatambedkartalegaonvbaforindiawomen-workers-meet-held-in-talegaon-sujat-ambedkar-leads-vanchit-bahujan-aghadi-pre-election-drive
Previous Post

रायगड : कळंबोलीत असंख्य कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश!

Next Post

मुंबई: २४६ नगरपालिका, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या तारखांची आज घोषणा होण्याची शक्यता

Next Post
मुंबई: २४६ नगरपालिका, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या तारखांची आज घोषणा होण्याची शक्यता

मुंबई: २४६ नगरपालिका, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या तारखांची आज घोषणा होण्याची शक्यता

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे
बातमी

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

by mosami kewat
September 19, 2026
0

 मुंबई : दिशा सालियान प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली....

Read moreDetails
खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

September 19, 2026
श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

September 19, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

September 19, 2026
जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home