नाशिक : बाळासाहेब आंबेडकर यांच्या तत्वनिष्ठ राजकारणावर विश्वास ठेवत नाशिक जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांचा वंचित बहुजन आघाडीत आज भव्य पक्षप्रवेश झाला. जिल्हा अध्यक्ष चेतन गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या प्रवेश सोहळ्यात रवी नागरे आणि सुनील इंगळे यांच्यासह अनेक प्रभावशाली कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.
रवी नागरे यांच्या प्रवेशामुळे नाशिकच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्याचे चित्र आहे. अनेक आमदार-खासदारांच्या विजयामागे नागरे यांचा मोठा वाटा राहिला असून, त्यांच्या प्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडीला नाशिकमध्ये सक्षम ओबीसी चेहरा मिळाल्याने संघटना अधिक मजबूत झाली आहे.
मराठा समाजाचे नेते सुनील इंगळे पाटील यांनीही आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून नव्या उर्जेचा संचार केला. तसेच सचिन रुपवते, जिल्हा परिषद सदस्य गणपत झोले, आरपीआय (आठवले गट) चे त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष यांच्यासह अनेक मान्यवरांनीही वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. नाशिक महानगरातून राष्ट्रवादीचे युवा नेते दीपक नऊल, शब्बीर शेख, कलीम हसन शहा, कैलास बेंडकुले, गणपत झोले, शाहरुख रियाज पठाण, राहुल लोंढे, साहेबराव पालवे, गौरव पालवे, रोशन थाठे, अमोल गांगुर्डे आणि असंख्य बहुजन कार्यकर्ते या वेळी पक्षात दाखल झाले.
वंचित बहुजन आघाडीकडून अकोल्यात नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर!
या प्रसंगी मार्गदर्शन करताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर म्हणाले, “नाशिक जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे काम चांगल्या गतीने सुरू आहे. अशाच प्रकारे संघटित व सक्रिय राहून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयी व्हा.”
यावेळी जिल्हा अध्यक्ष चेतन गांगुर्डे, जिल्हा प्रवक्ते बाळासाहेब शिंदे, जेष्ठ नेते करुणासागर पगारे, संघटक सागर रिपोर्टे, उपाध्यक्ष प्रशांत अहिरे, महिला आघाडी अध्यक्षा उर्मिला गायकवाड, उत्तर महाराष्ट्र सदस्य पंडित नेटावते, युवक महानगर प्रमुख दीपक पगारे, युवा महासचिव युवराज मणेर, उपाध्यक्ष नाना तपासे, मनोज उबाळे, सचिव ज्ञानेश्वर वाहूळे, त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष अरुण काशीद, युवा जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब शेजवाळ, वाल्मिक गायकवाड, गोकुळ कडलक, सागर साळवे, प्रशांत बाविस्कर आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.





