मुंबईत महामोर्चा : मनुवाद मुर्दाबादच्या घोषणांनी दुमदुमली सीएसटी
मुंबई : वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे आंबेडकरवादी जनतेच्या महामोर्चाने मनुवाद्यांना चोख उत्तर देण्यात आले.
मध्य प्रदेशमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मनुवाद्यांकडून अवमानकारक वक्तव्य करण्यात आले होते. या निषेधार्थ आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी हा एल्गार पुकारण्यात आला आहे.
बार्टीचे नियोजन कोलमडले; शौर्य दिनी अनुयायांचे प्रचंड हाल; प्रशासनाचा १५ कोटींचा निधी गेला कुठे?
या महामोर्चाला मोठ्या प्रमाणात संविधान प्रेमींचा जनसागर उसळला होता. संविधान वाचवण्याची जबाबदारी ही फक्त आंबेडकरवाद्यांची नाही, तर संपूर्ण भारत देशातील नागरिकांची जबाबदारी आहे. आरएसएस आणि मनुवादी लोक सातत्याने बाबासाहेबांचा अवमान करतात. त्यामुळे समाजात द्वेष पसरवणाऱ्या RSS आणि मनुवादी संघटनांवर बंदी घालावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मनुवाद मुर्दाबाद, संविधान जिंदाबाद अशा घोषणांनी सीएसटी परिसर दुमदुमला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहेत, त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही. पोलिस आणि सरकारने आरोपींवर त्वरित कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
कंधार नगरपालिका: वंचित बहुजन आघाडीच्या गटनेतेपदी नगरसेवक दिलीप देशमुख यांची निवड
शोषित, वंचित, पीडित यांच्यावरील अन्याय अत्याचार सहन करून घेतला जाणार नाही. भाजपने देशात लोकशाहीचा तमाशा बनवला आहे अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. हा लढा फक्त एका जातीपुरता नाही, तर देशासाठी आहे. देश हितासाठी आणि लोकशाहीसाठी आमचा लढा सुरू राहील, असे या वेळी सांगण्यात आले.
मध्य प्रदेश आणि केंद्र सरकार यांचा आम्ही जाहीर निषेध करतो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आणि संविधानाची विटंबना करणाऱ्या देशद्रोही आरोपींवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.






