Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मणिपूर: उखरूलमध्ये सशस्त्र गटांकडून घरांची जाळपोळ; तणावानंतर संचारबंदी लागू

mosami kewat by mosami kewat
February 10, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मणिपूर: उखरूलमध्ये सशस्त्र गटांकडून घरांची जाळपोळ; तणावानंतर संचारबंदी लागू
       

इम्फाळ: मणिपूरमधील उखरूल जिल्ह्यातील लिटान सारेइखोंग गावात सोमवारी (दि. ९)  दुपारी पुन्हा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. काही सशस्त्र गटांनी गावातील घरांना आग लावल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे अनेक ग्रामस्थांना आपली घरे सोडून शेजारच्या कांगपोकपी जिल्ह्यातील सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे.

या संघर्षाची सुरुवात तंगखुल नागा समाजातील एका व्यक्तीवर ७ ते ८ जणांनी हल्ला केल्यानंतर झाली. हा वाद लिटान सारेइखोंगचे गावप्रमुख आणि पीडित पक्ष यांच्यात पारंपरिक पद्धतीने मिटवण्याचे ठरले होते. मात्र रविवारी नियोजित बैठक होऊ शकली नाही. त्यानंतर सिकिबुंग गावातील काही लोकांनी गावप्रमुखाच्या घरावर हल्ला केल्याचे सांगितले जाते. (Manipur News)

रविवारी संध्याकाळी तंगखुल नागा आणि कुकी समाजातील सदस्यांमध्ये दगडफेक झाली. त्यानंतर रात्री उशिरा कुकी बंडखोरांकडून तंगखुल समाजाच्या घरांना आग लावण्यात आली. या घटनेच्या प्रत्युत्तरादाखल कुकी समाजातील काही घरांचेही नुकसान झाले.

या दरम्यान काही सशस्त्र टोळ्यांनी अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करत हवेत गोळीबार केल्याने परिसरात दहशत पसरली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने उखरूल जिल्ह्यात रविवारीच संचारबंदी लागू केली आहे. महादेव, लंबुई आणि शांगकाई यांसारख्या संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. (Manipur News)

तंगखुल ही मणिपूरमधील सर्वात मोठी नागा जमात असून लिटान सारेइखोंग हे कुकीबहुल गाव आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले जात असले, तरी तणाव कायम आहे.


       
Tags: AlertManipur NewspolicePolitical
Previous Post

‘माझी जात मानव’; नेवासा तालुक्यातील सौंदाळा गाव अधिकृतपणे ‘जातमुक्त’ घोषित!

Next Post

पारधी महिलेला जातीवाचक शिवीगाळ; पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करा, वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Next Post
पारधी महिलेला जातीवाचक शिवीगाळ; पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करा, वंचित बहुजन आघाडी आक्रमक

पारधी महिलेला जातीवाचक शिवीगाळ; पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करा, वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीचे आज नागपुरात आंदोलन; कायदा-सुव्यवस्थेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
बातमी

वंचित बहुजन आघाडीचे आज नागपुरात आंदोलन; कायदा-सुव्यवस्थेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

by mosami kewat
March 23, 2026
0

नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज, सोमवार दि. 23 मार्च 2026 रोजी नागपूर येथे...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्याकडून नागपूर येथील संयुक्त मोर्चा स्थळाची पाहणी

वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्याकडून नागपूर येथील संयुक्त मोर्चा स्थळाची पाहणी

March 22, 2026
ओबीसी चळवळीतील लढवय्या नेता शब्बीर अन्सारी यांचे निधन; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भावपूर्ण आदरांजली

ओबीसी चळवळीतील लढवय्या नेता शब्बीर अन्सारी यांचे निधन; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भावपूर्ण आदरांजली

March 22, 2026
हॅपिनेस इंडेक्स २०२६: स्कॅन्डेनेव्हियन देशांचे यश आणि भारतापुढील आव्हाने

हॅपिनेस इंडेक्स २०२६: स्कॅन्डेनेव्हियन देशांचे यश आणि भारतापुढील आव्हाने

March 21, 2026
२३ मार्चच्या नागपूर मोर्चासाठी वाहनांना टोलमाफी द्या; यवतमाळमध्ये 'वंचित'चे प्रशासनाला निवेदन

२३ मार्चच्या नागपूर मोर्चासाठी वाहनांना टोलमाफी द्या; यवतमाळमध्ये ‘वंचित’चे प्रशासनाला निवेदन

March 21, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home