वंचित बहुजन आघाडीने व्यक्त केला विश्वास
मुंबई : राजकीयदृष्ट्या दिवाळखोर भाजप आणि घोंचू मोदी जशा निवडणुका जवळ येत आहेत तसेतसे हताश होत आहेत. भाजप ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करून विरोधी पक्षातील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपमध्ये येण्यास भाग पाडत आहे. काही नेत्यांनी भाजपमध्ये जाण्यासाठी तयारी दाखवली असली, तरी महाविकास आघाडी मजबूत राहील, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीने ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
काँग्रेसचे माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सोपवला आहे. दोन दिवसांत ते राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने ट्विटरच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी मजबूत राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे.