Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

भाजपच्या पायाखालची वाळू सरकली – ॲड.प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 12, 2024
in Uncategorized
0
भाजपच्या पायाखालची वाळू सरकली – ॲड.प्रकाश आंबेडकर
       

जनतेला घाबरवण्याचा प्रयत्न : ॲड.प्रकाश आंबेडकर

पुणे : काल देशभरात साडेचारशे ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. त्या धाडी राजकीय नव्हत्या, तर अराजकीय होत्या. या धाडी टाकण्याचे कारण म्हणजे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते कितीही म्हणत असतील की, आम्ही चारशे प्लस जागा जिंकणार आहोत, तर ते भीतीपोटी आहे. भीती निर्माण व्हावी म्हणून ते राजकीय आणि अराजकीय (व्यापारी) यांच्यावर देखील धाडी टाकत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितले.

भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर साक्ष नोंदवण्यासाठी आले असताना त्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. भाजप ही भयग्रस्त झाली आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण तयार करून लोकांनाही भयग्रस्त करून आपल्याला जिंकता येतंय का? अशी त्यांची खेळी आहे. म्हणून राजकीय नेते, व्यापारी यांच्यावर धाडी सुरू झाल्या आहेत. आम्ही सर्वसामान्य लोकांना असे विचारतो की, तुम्हाला हे अपेक्षित आहे का? भीती निर्माण करण्यासाठी धाडी हे यंत्र भाजप वापरत असल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली. महाराष्ट्र कधीही इतका वादग्रस्त नव्हता. या ठिकाणी स्टेबल सरकार चालत होतं. सध्या पक्ष फोडणं, गोळीबार करणं, धमकावणं हे फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हे मराठी माणसाच्या मानसीकतेला झेपणारं नाही. तो त्याच्याशी सहमत नाही. त्यामुळे तो इलेक्शनची वाट पाहत आहे, असेही ते म्हणाले.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे राजीनामा सोपवला यावर प्रतिक्रिया देताना ॲड. आंबेडकर म्हणाले की, आमच्या पक्षात मंत्री होते, आमदार होते ते निघून गेले. पण, पक्ष म्हणून काही परिणाम झाला नाही. एखाद्याचे पक्ष सोडून जाणे हे धक्कादायक असते. मात्र, त्याने पक्षावर काही परिणाम होतो असे मला वाटत नाही. नरेंद्र मोदी हे रिंगमास्टर आहेत आणि जेवढे नेते चौकशी खाली आहेत, त्यांना ते नाचवणार आहेत. उच्च नेते किंवा त्याखालील नेते यांनाही ते नाचवणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

भीमा कोरेगाव दंगल पोलिसांनी घडवली –

भीमा कोरेगाव दंगल पोलिसांनी घडवली आहे. आयोगासमोर हा विषय वळवण्याचा प्रयत्न होत होता आणि ते माझ्या तोंडून वदवून घ्यायचा त्यांचा प्रयत्न होता. म्हणून मी आयोगाला म्हटलं की, मला जेवढी माहिती द्यायची होती तेवढी दिली आहे. आता मी थांबतो. अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली.


       
Tags: Bhima KoregaobjpMaharashtraPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

मिस्टर अँड मिसेस आंबेडकरांचा साधेपणा !

Next Post

महाविकास आघाडी मजबूत राहील!

Next Post
महाविकास आघाडी मजबूत राहील!

महाविकास आघाडी मजबूत राहील!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बोधगया येथील महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी रवाना
बातमी

बोधगया येथील महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी रवाना

by mosami kewat
July 3, 2025
0

अकोला : बोधगया येथे सुरू असलेल्या महाबोधी मुक्ती आंदोलनात वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे येत्या 5...

Read moreDetails
चिंताजनक! बीडमध्ये अल्पवयीन मुली असुरक्षित: ५ महिन्यांत बाललैंगिक अत्याचाराचे ७८ गुन्हे दाखल ‎ ‎

चिंताजनक! बीडमध्ये अल्पवयीन मुली असुरक्षित: ५ महिन्यांत बाललैंगिक अत्याचाराचे ७८ गुन्हे दाखल ‎ ‎

July 3, 2025
Kolhapur Gadhinglaj : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ संतप्त ; आजारी आजीला चिखलातून बैलगाडीने नेण्याची वेळ ‎

Kolhapur Gadhinglaj : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ संतप्त ; आजारी आजीला चिखलातून बैलगाडीने नेण्याची वेळ ‎

July 3, 2025
वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक आणि पक्षप्रवेश उत्साहात पार

वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक आणि पक्षप्रवेश उत्साहात पार

July 3, 2025
भोकरदन ॲसिड प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून पीडितेची भेट ; दोषींवर कारवाईचे आश्वासन ‎ ‎

भोकरदन ॲसिड प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून पीडितेची भेट ; दोषींवर कारवाईचे आश्वासन ‎ ‎

July 3, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क