राष्ट्रीय नेते :
खासदार अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष राजा ढाले
केंद्रीय कार्यालय डॉ. आंबेडकर भवन, गोकुळदास पास्ता रोड, चित्र टॉकीजच्या मागे, दादर (पूर्व), मुंबई-४०००१४, फोन/फैकाव ४१५ ११९१ दिनांक: २४ सप्टेंबर २००२.
प्रति,
मा. —————
सप्रेम जयभीम,
ओबीसी, भटके-विमुक्त, अनु. गती-जमातींचे घनादन अधिकार ठरविण्याचा अधिकार कोणाला? न्यायालय की लोकनियुक्त संसद/विधीमंडळाला?
कार्यक्रम ठरविण्यासाठी महत्त्वाची बैठक : दि १२ ऑक्टो ०२. स. ११.३० वा.
२३ सप्टेंबर २००२ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर व औरंगाबाद खंडपीठाच्या निकालामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर विचारविनिमय करण्यासाठी विविध संघटनांबी बैठक मुंबईत झाली. भारिप बहुजन महासंघाचे नेते खासदार अॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब अबिडकर बांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला विविध संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब अबिडकर, महात्मा जोतीराव फुले व राजर्षी शाहू महाराज वांच्या चळवळींमुळे भारतीय राज्यघटनेनुसार ओबीसी-भटके-विमुक्त-अनु.जाती-जमातीना राखीव जागांसह काही सोयी सवलती मिळू लागल्या. त्यासंदर्भात फेर आढावा घेण्याचा, त्या काढून घेोग्याचा अधिकार बा लागू करण्याचा अधिकार न्यायालयाला आहे की लोकनियुक्त संसदेला /विधीमंडळाला आहे? हा मूलभूत प्रश्र या निमित्ताने परत एकदा निर्माण झाला आहे; अशी प्रतिक्रिया बैठकीतील सर्व प्रतिनिधींनी व्यक्त केली. हे अधिकार न्यायालयामार्फत काढून घेताना राज्य सरकार चूप बसून आहे. बातन त्यांची भूमिका स्पष्ट होते. म्हणून तमाम ओबीसी, भटके-विमुक्त, अनु. जाली., जमातीमधील समूहांनी संघटित होण्याची गरज सर्वांनी व्यक्त केली. ओबीसींना योग्य नेतृत्व व दिशा नसल्यामुळेचा ओबीसीसारख्या बहसंख्य समाजाची अशी दशा झाल्याचेही अनेकांनी बैठकीत सांगितले.
या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयावर तमाम ओबीसी, भटके-विमुक्त, अनु. जाती, जमातींमधील समूहांचा पिटीशन (विनंती अर्ज) दाखल करण्यासाठी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. राखीव जागांच्या मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, आदिवासी, भटके-विमुक्त, ३. समूहांच्या अनुसूचितीत्त (यादीतीत्त) जाती काळण्याचे व समाबेश करण्याचे अधिकार कोर्टाला नाहीत, हे अधिकार फक्त लोकप्रतिनिधी गृह (विधानसभा, लोकसभा) मांनाच आहे. हा पिटीशनचा मुद्दा असेल. हे पिटीशन सर्च संघटनांच्या वतीने करण्यात मेईल.
न्यायालयांच्या निर्णयांबाबत जे राजकीय पक्ष, संघटना स्पष्ट भूमिका घेतील त्या सर्वांना या आंदोलनात सहभागी करून घेण्यात येईल, असाही निर्णय घेण्यात आला. यासाठी मुंबईसह परिसरात संयुक्तपणे प्रबार दौरा घेण्यात येईल. या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी
शनिवार, दि. १२ ऑक्टोबर, २००२ रोजी सकाळी ११.३० बा. खालील पत्त्यावर अनु. जाती-जमातींमधील समूहांच्या संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला आपल्या संघटनेचे प्रतिनिधी पाठवावेत, ही विनंती.
सोबत आपल्या संघटनेचा या आंदोलनात सहभागी होत असल्याचा लेखी ठराव आणावा, ही विनंती.
वा बैठकीला भारिप बहुजन महासंघाचे नेते मा. खास. अॅड. बाळासाहेब आबेडकर आणि पक्षाध्यक्ष मा. राजा द्वाले उपस्थित राहणार आहेत.
बैठक: भारिप बहुजन महाळय राज्य कार्यालय, शासकीय बरक नं.८, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मनोरा आमदार निवास समोर, मुंबई-४००.०२१. फोन नं: (०२२) २८१ ६२८६.
आपली,
रेखा ठाकूर
केंद्रीय महासचिव,
भारिप बहुजन महासंघ,