मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जाहीर केलेल्या विविध पदांच्या भरती प्रक्रियेत अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), आणि इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गांसाठी राखीव जागा नसल्याने मोठा असंतोष निर्माण झाला आहे. या संदर्भात, सामाजिक संघटना आणि इच्छुक उमेदवारांनी राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन देऊन भरती प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत आरक्षित गटांसाठी कोणत्याही जागा ठेवण्यात आलेल्या नाहीत. याशिवाय, अर्ज शुल्क म्हणून १,१०० रुपये आणि नियुक्तीनंतर १० लाखांचा बॉन्ड अशा अटी ठेवण्यात आल्या आहेत, ज्याला उमेदवारांकडून तीव्र विरोध होत आहे.
निवेदनात सहकार मंत्र्यांना विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी या भरती प्रक्रियेत तातडीने हस्तक्षेप करून सध्याची जाहिरात मागे घ्यावी आणि रद्द करावी. तसेच, नवीन जाहिरात काढून त्यामध्ये SC, ST, OBC या आरक्षित समूहातील वर्गांसाठी राखीव जागा ठेवण्यात याव्यात. यासोबतच, अर्ज शुल्कापोटी घेण्यात येणारी मोठी रक्कम आणि १० लाखांचा बॉन्ड या अटींमध्येही कपात करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निफाड तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची भव्य आढावा बैठक यशस्वीरीत्या पार पडली
नाशिक : वंचित बहुजन आघाडीची जि. नाशिक ता. निफाडची आढावा बैठक पिंपळगाव बसवंत येथील रुचा हॉटेल येथे जिल्हाध्यक्ष चेतनभाऊ गांगुर्डे...
Read moreDetails