महाराष्ट्रात लवकरच २९ महानगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा, ३३६ पंचायत समित्या, २४८ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी प्रशासकीय स्तरावर जोरदार तयारी सुरू झाली आहे.
या तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने १० जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हालचालींना वेगसर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले. यामुळे प्रभाग रचनेच्या कामाला सुरुवात झाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, मतदार संख्या, मतदान केंद्र, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM) आणि आवश्यक मनुष्यबळ याबाबत सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी याबाबतचे पत्र सर्व विभागीय आयुक्तांना पाठवले आहे.
EVM आणि मनुष्यबळाचे नियोजनया निवडणुका इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे (EVM) होणार असल्याने, जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यात सध्या उपलब्ध असलेल्या कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि मेमरीची अद्ययावत माहिती देण्यास सांगितले आहे. याचसोबत EVM ची प्राथमिक स्तर तपासणी (First Level Checking – FLC) करून घेण्याचा कार्यक्रम निश्चित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
मतदान यंत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी सध्याच्या व्यवस्थेचा आणि गोदामांचा तपशील मागवण्यात आला आहे. याशिवाय, नवीन मतदान यंत्रे खरेदी करण्याची शक्यता असल्याने, त्यासाठी आवश्यक जागा निश्चित करण्यासही सांगितले आहे.
EVM प्रशिक्षणासाठी उपलब्ध मास्टर ट्रेनर्स आणि अतिरिक्त ट्रेनर्स तसेच आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध असल्याची खात्री करावी. मनुष्यबळ कमी पडल्यास संबंधित विभागीय आयुक्तांकडे मागणी सादर करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.