Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत; अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे मोठे नुकसान

mosami kewat by mosami kewat
July 22, 2025
in बातमी
0
महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत; अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे मोठे नुकसान

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत; अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे मोठे नुकसान

‎मुंबई : पालघरसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जालना, वाशिम आणि अकोला जिल्ह्यांनाही पावसाचा मोठा फटका बसला असून, शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक प्रमुख मार्ग बंद झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे, तर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
‎
‎जालन्यात ढगफुटीसदृश पाऊस: शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले
‎
‎जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात काल सायंकाळ आणि मध्यरात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शेतीत पाणी साचले आहे. तळणी परिसरात पावसाचा जोर इतका होता की, खरीप हंगामातील कपाशी, सोयाबीन, मका यासह इतर पिके पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. नद्या आणि नाल्यांना पूर आल्याने शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास ३ ते ४ तास चाललेल्या या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली आहे.
‎
‎वाशिम जिल्ह्यात पूरस्थिती, वाहतूक ठप्प
‎
‎वाशिम जिल्ह्यात आज पहाटेपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रिसोड तालुक्यातील शेलू खडसे, वाकद आणि बालखेड परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतात पाण्याचा मोठा प्रवाह शिरला आहे, ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेकडो एकर शेती पाण्याखाली गेल्याने बालखेड ते वाकद गावाचा संपर्क तुटला आहे.
‎
‎या पावसामुळे रिसोड-मेहकर, करडा-गोभणी, सरपखेड-धोडप बुद्रुक हे प्रमुख मार्ग पूर्णतः बंद झाले असून, वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासनाने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Tags: Crop DamageMaharashtra Rainsmumbaiwashim
Previous Post

नालासोपारा जवळच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद कंटेनर आढळला; तपास सुरू

Next Post

‎देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव

Next Post
‎देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव

‎देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
रविदासिया धर्म संघटनेचे सुखदेव महाराज यांचे निधन; ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून भावपूर्ण आदरांजली
बातमी

रविदासिया धर्म संघटनेचे सुखदेव महाराज यांचे निधन; ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून भावपूर्ण आदरांजली

by mosami kewat
June 22, 2026
0

पुणे : अखिल भारतीय रविदासिया धर्म संघटन भारताचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव जी महाराज यांच्या दुःखद निधनानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय...

Read moreDetails
इतिहासाची छेडछाड: भिडे वाड्याचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न? बालभारतीच्या तिसरीच्या पुस्तकावरून नवा वाद

इतिहासाची छेडछाड: भिडे वाड्याचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न? बालभारतीच्या तिसरीच्या पुस्तकावरून नवा वाद

June 22, 2026
जीडीपीची भरारी आणि सामान्यांचे जगणे: विकासाच्या गणितात आमचे ‘हित’ कुठे आहे?

जीडीपीची भरारी आणि सामान्यांचे जगणे: विकासाच्या गणितात आमचे ‘हित’ कुठे आहे?

June 22, 2026
FIH Nations Cup 2026 : भारतीय महिला हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी; न्यूझीलंडचा पराभव करत पटकावला ‘नेशन्स कप’!

FIH Nations Cup 2026 : भारतीय महिला हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी; न्यूझीलंडचा पराभव करत पटकावला ‘नेशन्स कप’!

June 22, 2026
जायकवाडी वसाहत पंचशील ध्वज अवमान प्रकरणी २३ जून रोजी वंचितचा जनआक्रोश मोर्चा

जायकवाडी वसाहत पंचशील ध्वज अवमान प्रकरणी २३ जून रोजी वंचितचा जनआक्रोश मोर्चा

June 21, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home