महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये केवळ राजकीय पक्षांमध्ये चुरशीची लढत झाली नाही, तर लोकशाही प्रक्रियेची पारदर्शकता आणि निष्पक्षता किती महत्त्वाची आहे, हे निवडणुकीतून समोर आले. निवडणुकीत मतदानाचा वेळ संपल्यानंतर, म्हणजे सायंकाळी ६ वाजेनंतर ७६ लाख मते टाकण्यात आली, ज्यामुळे एक असामान्य आणि गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील अनियमिततेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयात मागणी केली की, या मतदानाचे व्हिडिओग्राफी आणि इतर पुरावे उपलब्ध करून देण्यात यावेत, जेणेकरून जनतेला सत्य कळावे. मात्र, जेव्हा VBA ने माहिती अधिकार (RTI) द्वारे ६ वाजेनंतर झालेल्या मतदानाचा तपशील मागितला, तेव्हा उत्तरात असे सांगण्यात आले की, असा कोणताही रेकॉर्ड उपलब्ध नाही. VBA चे प्रतिनिधी चेतन अहिरे यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली, जी उच्च न्यायालयाने स्वीकारली, आणि यामुळे देशभरात चर्चेला तोंड फुटले आहे.
याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही सडकून टीका केली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत x ( twitter ) हॅण्डलवर ट्विट केले आहे. ते म्हणजे, वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी चेतन अहिरे यांनी माननीय मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, जी ३ फेब्रुवारी रोजी स्वीकारण्यात आली.
तसेच मी चेतन अहिरे यांचे प्रतिनिधित्व करत असून हे प्रकरण न्यायालयात लढत आहे, त्यानंतर भारत निवडणूक आयोगाला नोटीस पाठवण्यात आली होती. पुढे ते म्हणाले, राहुल गांधींपासून ते शरद पवारांपर्यंत कोणामध्येही इतकी हिंमत नाही की, ते न्यायालयात जाऊन याची नोंद मागू शकतील.
गोवंडीतील खड्ड्यांवर वंचित महिला आघाडीचा तीव्र विरोध”खड्डे बुजवा, नाहीतर अधिकारी खड्ड्यात!”
गोवंडीतील खड्डेमय रस्त्यांवर व नाल्यांच्या दुर्दशेवर वंचित बहुजन महिला आघाडीचे तीव्र आंदोलन; महापालिकेला इशारा "खड्डे बुजवा नाहीतर अधिकाऱ्यांना खड्ड्यात घाला!"...
Read moreDetails