बोधगया : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी ऐतिहासिक महाबोधी मुक्ती आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवण्याची घोषणा केली आहे. ५ जुलै रोजी वर्षावास सुरू होण्यापूर्वीच ते बोधगया येथे दाखल होणार आहेत अशी माहिती त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून दिली आहे.
महाबोधी मंदिराचे व्यवस्थापन आणि स्वायत्ततेच्या मागणीसाठी सुरू असलेले हे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आले आहे. सुजात आंबेडकर यांच्या सहभागामुळे या आंदोलनाचे स्वरूप अधिक व्यापक होण्याची अंदाज वर्तवण्यात येत आहे.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, “संपूर्ण भारतात महाबोधी मुक्ती आंदोलनाचा आवाज बुलंद करण्याची प्रतिज्ञा घेत, सर्वांना माझ्यासोबत बोधगया येथे येण्याचे आवाहन करतो.” या आंदोलनात महाराष्ट्रातून बौद्ध समाज संवाद यात्रेचे प्रतिनिधी आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील हा सहभाग बौद्ध समाजाच्या हक्क आणि अस्तित्वाच्या प्रश्नांना राष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभावीपणे मांडण्यास मदत करेल, असे मानले जात आहे. महाबोधी मंदिर हे बौद्ध धर्मातील एक अत्यंत पवित्र स्थान आहे आणि त्याच्या व्यवस्थापनाबाबत दीर्घकाळापासून वाद सुरू आहे.
बौद्ध समाजाची मागणी आहे की, या मंदिराचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध धर्माच्या अनुयायांकडे असावे. सुजात आंबेडकर यांच्या सहभागामुळे या मागणीला एक मजबूत राजकीय आणि सामाजिक पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा केली जात आहे.
छत्तीसगडमध्ये मॅग्नेटो मॉलमध्ये बजरंग दलाची तोडफोड; कर्मचाऱ्यांची जात-धर्म विचारून हल्ला
रायपूर : छत्तीसगढ येथे धक्कादायक घटना घडली आहे. ख्रिसमसच्या दिवशी बजरंग दलाच्या ३० ते ४० कार्यकर्त्यांकडून कडून एका मॉलमध्ये तोडफोड...
Read moreDetails






