नाशिक : शासकीय नोकऱ्यांचे व शैक्षणिक संस्थांचे कंत्राटीकरण करण्याच्या सरकारच्या धोरणाविरोधात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात नाशिक येथे एल्गार मोर्चाचे आयोजन ता. ९ नोव्हेंबर रोजी ,करण्यात आले होते. बि. डी. भालेकर मैदान ते नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला होता. सर्व प्रकारची कंत्राटीभरती रद्द करा, सरकारी क्षेत्राचे खाजगीकरण बंद करा, फी वाढ रद्द करा, तसेच पेपरफुटीसंदर्भात कडक कायदा करा अशा विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात एल्गार मोर्चा काढण्यात आला.
सरकार कंत्राटीकरणासारखे कायदे, नियम करत आहे याचा अर्थ सरकार त्यांनी भाडयानं द्यायचं ठरवलं आहे. महाराष्ट्रात १२ ते २० प्रस्थापित कुटुंबे आहेत त्यांनी महाराष्ट्रातील पाण्यावर ताबा ठेवला आहे धरणे कुठे बांधायची, पाणी कुठ फिरवायचं हे ते ठरवतात यामुळे इथले साखर कारखाने, शेती उद्योग इत्यादी या प्रस्थापित कुटुंबाकडे आहे. महाराष्ट्रातील ८० टक्के समाज शिक्षण आणि नोकरी यांपासून कायम वंचित राहिला आहे असे सुजात आंबेडकर यांनी म्हटले आहे.
शिंदे- फडणवीस -अजित पवार यांच्या आर्थिक हित संबंधासाठी कंत्राट देऊन इथल्या वंचित, गोरगरीब, कष्टकरी समुहातील तरुण-तरुणींना वंचित ठेवण्याचं सरकारच षडयंत्र आहे. असा घणाघात सुजात आंबेडकरांनी सरकारवर घातला.