नाशिक :राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते नितीन मोहिते यांनी हजारो कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला नाशिक मध्ये मोठे भगदाड पडले आहे.वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय ॲड.अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे हा प्रवेश सोहळा पार पडला.
वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष पवन पवार, उत्तर महाराष्ट्र महासचिव वामन गायकवाड, महानगर प्रमुख अविनाश शिंदे महानगर सचिव बजरंग शिंदें याच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला आशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे महानगराध्यक्ष अविनाश शिंदे यांनी दिली.
नितीन मोहिते हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणून गणले जातात. देवळाली मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही लढवली होती. त्यांना चांगली मतेही पडली होती.देवळाली मतदारसंघासह नाशिक शहर तसेच जिल्ह्यात त्यांच्या नावाचे मोठे वलय आहे. त्यांच्या तसेच त्यांच्या समर्थकांच्या प्रवेशाने वंचित बहुजन आघाडीला मोठे बळ मिळेल,असेही शिंदे यांनी पुढे नमूद केले. वंचित बहुजन आघाडी नाशिक महानगर तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बळकट होत आहे. भाजपाला पर्याय म्हणून अनेक जण वंचित बहुजन आघाडीकडे मोठ्या आशेने बघतात. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी निश्चितच काहीतरी करिष्मा करेल असा लोकांना विश्वास वाटत आहे. विविध पक्षातील मान्यवर नेते आघाडीशी संपर्क साधून असून ते सुद्धा लवकरच पक्षात प्रवेश करतील, असेही शिंदे यांनी पुढे म्हटले आहे.
या पक्ष प्रवेशाने राष्टवादी अजित पवार गटाचे मोठे नुकसान झाले असल्याची चर्चा होत आहे. पक्षाचे विचार आणि पक्ष संघटना वाढीसाठी आजपासून काम करणार असल्याचे नितीन मोहिते यांनी सांगितले.
यावेळी, सामजिक कार्यकर्ते शंकर जाधव जलालपुर सरपंच श्री.अनिल जाधव सामजिक कार्यकर्ते अरुण काशीद, मराठा समाजाचे नेते तुकाराम मोजाड, आनंद ढेरिंगे आदिवासीं सामज्याचे नेते किरण भाऊ वायकांडे पण सामजिक कार्यकर्ते शरद साळवे धोंडीराम गलांडे मुकेश रामराजे अरुण रोकडे, सरपंच शाम गारे, सुरज गांगुर्डे, सुनील साळवे उत्तम साळवे चाणसी ग्रंपंचायत मा सरपंच शरद धोंगडे,सागर भालेराव विलास जाधव अमित जाधव बाळासाहेब जाधव भाऊराव साळवे राहुल जाधव बाळासाहेब पगारे अखिलेश जाधव सोमनाथ कराटे जगन गुळवे सिताराम धुमाळ विजय गायकवाड गौतम पगारे संतोष बेंडकुळे सोमनाथ दिवे भाऊसाहेब दिवे निखिल जाधव आकाश जाधव सुरेश जाधव रामदास जाधव सुरेश दोंदे आदी मान्यवरांनी प्रवेश केला आहे.