लातूर : वंचित बहुजन आघाडी, लातूर जिल्हा कार्यालयात आदरणीय अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर शहरात पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात मुस्लिम समाजातील अनेक युवकांनी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. यामध्ये रहीम बागवान, तौहीद बागवान यांच्यासह अनेक मुस्लिम युवकांचा समावेश होता.
या प्रसंगी युवा प्रदेश सदस्य अमोल लंगडे, जिल्हा महासचिव रोहित सुमंशी, जिल्हा उपाध्यक्ष खलील शेख, शहराध्यक्ष कादिर मुनियार, शहराध्यक्ष सचिन गायकवाड, शहर महासचिव आकाश शिंगडे, शहर उपाध्यक्ष मुना पठाण, शहर सचिव सय्यद इस्माईल महिबूब तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडीचा लातूर शहरातील मुस्लिम समाजात अधिक प्रभाव वाढणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.