कोल्हापूर : दाटून आलेल्या ढगांनी कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा धडकी भरवली आहे. रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असली तरी, धरणक्षेत्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्यांची पातळी वेगाने वाढत आहे. राधानगरी, दूधगंगा, आणि वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पंचगंगा नदीने इशारा पातळीकडे (३९ फूट) वाटचाल सुरू केली आहे. दिवसभरात पंचगंगा नदीची पातळी अडीच फुटांनी वाढून ३५.११ फुटांवर पोहोचल्याने कोल्हापूरकरांची चिंता वाढली आहे.
पूरस्थिती आणि जनजीवन
जिल्ह्यात सध्या ५८ बंधारे पाण्याखाली गेले असून, त्यामुळे वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. शनिवारी दिवसभर आणि रविवारी सकाळपर्यंत जिल्ह्याने जोरदार पावसाचा अनुभव घेतला. रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १९.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असली तरी, गगनबावड्यात तब्बल ११९.८ मिलीमीटर पाऊस झाला. आजरा, भुदरगड, शाहूवाडी, राधानगरी आणि पन्हाळा तालुक्यांमध्येही तुलनेने अधिक पाऊस झाला आहे.
धरणातून पाण्याचा विसर्ग
कोल्हापूर शहर आणि शेजारील तालुक्यांमध्ये रविवारी दिवसभर पावसाची उघडझाप असली तरी, धरणक्षेत्रात पाऊस कायम आहे. राधानगरी धरणाचे ४, ५, ६ हे तीन स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून, प्रतिसेकंद ५७८४ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याशिवाय, वारणा धरणातून १३,५३० घनफूट आणि दूधगंगा धरणातून १६०० घनफूट पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदी चौथ्यांदा पात्राबाहेर पडल्याची माहिती आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत २० खासगी मालमत्तांची पडझड झाली असून, ६ लाख ५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील दोन राज्यमार्ग आणि सहा प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण आठ मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे या मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
एस.टी. बसचे चार मार्ग पूर्णपणे ठप्प झाले आहेत:
* चंदगड ते भोगोली
* चंदगड ते पिळणी
* चंदगड ते बोवाची वाडी
* गडहिंग्लज ते कोवाडे
* राधानगरी ते पडळ
महानगरपालिका निवडणुकीत ‘गॅस सिलेंडर’ चिन्हावर मतदान करा; प्रकाश आंबेडकरांचे जनतेला आवाहन
मुंबई: महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकच्या प्रचाराची रणधुमाळी संपली. उद्या मतदान करण्याचा सोनेरी दिवस उगवणार आहे. वेगवेगळ्या भागातून नागरिक मतदान करून आपले...
Read moreDetails






