‘वंचित’चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया
नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. चौकशीत योग्य ती उत्तरे न दिल्याने त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, कोर्टाने पहिल्यांदा ठरवलं पाहिजे की कॅबिनेट डिसीजनमध्ये झालेल्या निर्णयावर तुम्ही प्रश्न विचारु शकता का? चौकशी करु शकता का? हे बेसिक आहे. संविधानामध्ये कॅबिनेट नोट किंवा कॅबिनेट डिसिजन हे असताना तुम्हाला कोर्टामध्ये काॅल करता येत नाही. जेव्हा कोर्टामध्ये काॅल करता येत नाही. तेव्हा चौकशीसुद्धा होत नाही. हा फंडामेंटल इश्यू आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ते पहिल्यांदा ठरवावं, ही माझी सर्वोच्च न्यायालयाला विनंती आहे. ईडीला या पाॅलिसी डिसीजनच्या प्रकरणात जाता येत नाही. त्यामुळे ही एका प्रकारची दडपशाही असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.