बंगलोर – जैन विद्यापीठ बँगलोर येथे विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमात दलित समाजा बद्दल आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, परमपूज्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अर्वाच्च आणि अपमानजनक स्कीट सादर करण्यात आले होते.
याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर देखील वायरल करण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने राज्य सदस्य अक्षय बनसोडे यांनी नांदेड येथे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेऊन गुन्हे दाखल करण्या संदर्भात मागणी करण्यात आली.
तसेच हे स्किट सादर करणाऱ्या लोकांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.
(व्हिडिओ लिंक – https://www.instagram.com/reel/CoXebTdNbG-/?igshid=YmMyMTA2M2Y=)

