Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘जय भीम’ आणि ‘इंकलाब जिंदाबाद’च्या नाऱ्यांनी जंतर मंतर दणाणले; लाखो युवकांचा दिल्लीत एल्गार

mosami kewat by mosami kewat
July 20, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
‘जय भीम’ आणि ‘इंकलाब जिंदाबाद’च्या नाऱ्यांनी जंतर मंतर दणाणले; लाखो युवकांचा दिल्लीत एल्गार
       
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जंतर मंतर येथे सुरू असलेल्या नीट (NEET) पेपरफुटीप्रकरणी न्यायाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी आणि संसदेकडे मोर्चा काढण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने युवक जंतर मंतर येथे जमले असून,  ‘जय भीम’ आणि ‘इंकलाब जिंदाबाद’च्या घोषणांनी परिसर दणाणून आहे.

विद्यार्थ्यांच्या हितासाठी उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचूक यांच्या आवाहनानुसार आंदोलकांनी संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिल्ली पोलिसांनी मोर्चाला जंतर मंतरपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील केरळ भवनापर्यंतच परवानगी दिली. यावरून आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद झाला.

घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून जंतर मंतर परिसरातील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली असून मोबाईल जॅमर्सची संख्याही वाढवण्यात आली आहे. लाठीचार्ज आणि पोलिस कारवाईनंतरही आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. सध्या घटनास्थळी देशभरातून आलेल्या युवकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून हजारो आंदोलक आंदोलनात सहभागी झाले आहेत. ‘जय भीम’, ‘इंकलाब जिंदाबाद’सह विविध घोषणांनी आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला आहे. जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले आहे.

Jai Bhim, Inquilab Zindabad Slogans Echo at Jantar Mantar During NEET Protest

Tags: Delhi MarchJantar Mantar During NEET ProtestJantar Mantar ProtestMaharashtraNEETPoliticalprotestSonam wangchuk Hunger Strike
Previous Post

स्मार्ट मीटर हटवा, बोगस बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीचे मुर्तिजापूरमध्ये निवेदन

Next Post

वंचित बहुजन आघाडीत लोकशाहीचा नवा अध्याय, ३० जुलैला पक्षांतर्गत निवडणुका; प्रदेशाध्यक्षपदासाठी तिरंगी लढत

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home