Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

इस्लामपूर शहराच्या लौकिकात भर : स्वाती कांबळे यांची उपअधीक्षकपदी पदोन्नती

mosami kewat by mosami kewat
March 13, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
इस्लामपूर शहराच्या लौकिकात भर : स्वाती कांबळे यांची उपअधीक्षकपदी पदोन्नती

इस्लामपूर शहराच्या लौकिकात भर : स्वाती कांबळे यांची उपअधीक्षकपदी पदोन्नती

इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील डॉ. आंबेडकरनगर येथील रहिवासी तसेच मुंबई येथे कार्यरत असलेले पोलिस अधिकारी चंद्रकांत बाबासाहेब कांबळे यांच्या पत्नी स्वाती चंद्रकांत कांबळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (Anti-Corruption Bureau) उपअधीक्षक (DySP) पदावर पदोन्नती मिळाली आहे. त्यांच्या या यशामुळे इस्लामपूर शहराच्या लौकिकात भर पडली असून परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्वाती कांबळे यांनी अत्यंत परिश्रम, चिकाटी आणि प्रामाणिक सेवेमुळे ही पदोन्नती मिळवली आहे. त्यांच्या या यशामागे पती चंद्रकांत कांबळे यांचेही मोठे सहकार्य असल्याचे सांगितले जाते. दोघांनीही कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे. (IslampurNews)

चंद्रकांत कांबळे हे डॉ. आंबेडकरनगर परिसरातील रहिवासी असून ते उर्दू हायस्कूलचे सेवानिवृत्त कर्मचारी बाबासाहेब आत्मा कांबळे यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या कुटुंबाचा सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात चांगला लौकिक आहे. स्वाती कांबळे यांच्या या पदोन्नतीबद्दल डॉ. आंबेडकरनगर परिसरातील नागरिक, मित्रपरिवार आणि विविध सामाजिक संघटनांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे. (IslampurNews)

Tags: AntiCorruptionBureaubreakingnewsDySPPromotionIslampurNewsLocalNewsMaharashtraPolicePolicePromotionPrideOfIslampurProudMomentSuccessStoryWomenAchievementWomenInPolice
Previous Post

पुणे: गॅस तुटवड्यामुळे खाद्यान्न साखळी विस्कळीत; ऑनलाइन फूड ऑर्डर्स स्वीकारणे तात्पुरते बंद

Next Post

भू-राजकीय बुद्धिबळाचा रक्तरंजित खेळ: ट्रम्प यांच्या पलीकडची रणनीती

Next Post
भू-राजकीय बुद्धिबळाचा रक्तरंजित खेळ: ट्रम्प यांच्या पलीकडची रणनीती

भू-राजकीय बुद्धिबळाचा रक्तरंजित खेळ: ट्रम्प यांच्या पलीकडची रणनीती

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Aurangabad Weekly Market : शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नका! आठवडी बाजार सुरू ठेवण्यासाठी वंचितचे प्रशासनाला निवेदन
बातमी

Aurangabad Weekly Market : शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नका! आठवडी बाजार सुरू ठेवण्यासाठी वंचितचे प्रशासनाला निवेदन

by mosami kewat
April 2, 2026
0

औरंगाबाद : शहरातील सोमवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी भरत असलेल्या आठवडी बाजार बंद करण्याच्या इशाऱ्याविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र...

Read moreDetails
घारगाव येथे तमाशा फडावर भ्याड हल्ला; कलावंतांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

घारगाव येथे तमाशा फडावर भ्याड हल्ला; कलावंतांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

April 2, 2026
ढोंग, सोंग आणि भोंगळ राज्यकर्ते!

ढोंग, सोंग आणि भोंगळ राज्यकर्ते!

April 2, 2026
Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडरच्या टंचाईने घेतला तरुणाचा बळी; तिवसा तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडरच्या टंचाईने घेतला तरुणाचा बळी; तिवसा तालुक्यातील हृदयद्रावक घटना

April 2, 2026
सिलेंडर टंचाई, महागाई आणि बेरोजगारीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर जोरदार हल्ला

सिलेंडर टंचाई, महागाई आणि बेरोजगारीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर जोरदार हल्ला

April 2, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home