Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

जातीभेदामुळे आयपीएस अधिकारी वाय. पुरन कुमार यांची आत्महत्या; जातीय मानसिकतेचा बळी – ॲड. प्रकाश आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
October 10, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
जातीभेदामुळे आयपीएस अधिकारी वाय. पुरन कुमार यांची आत्महत्या; जातीय मानसिकतेचा बळी - ॲड. प्रकाश आंबेडकर

जातीभेदामुळे आयपीएस अधिकारी वाय. पुरन कुमार यांची आत्महत्या; जातीय मानसिकतेचा बळी - ॲड. प्रकाश आंबेडकर

       

चंदीगड : हरियाणा केडरमधील वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP) वाय. पूरन कुमार यांनी मंगळवारी चंदीगड येथील त्यांच्या सरकारी निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पूरन कुमार यांच्या आत्महत्येमागे कार्यालयातील ताण, प्रशासकीय छळ आणि जातीय भेदभाव असल्याची माहिती त्यांच्या सुसाइड नोटमधून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १:३० वाजता त्यांनी घराच्या साउंडप्रूफ तळघरात सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी झाडली. घटनेपूर्वी त्यांनी सुरक्षा रक्षकांना बाहेर जाण्याचे आदेश दिले होते. आत्महत्येच्या वेळी ते रजेवर होते आणि त्यांची पत्नी, आयएएस (IAS) अधिकारी अमनीत पी. कुमार, या मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्यासोबत जपान दौऱ्यावर होत्या.

सुसाइड नोटमध्ये गंभीर आरोप

घटनास्थळी सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये (मिळालेल्या माहितीनुसार, ती ८ ते ९ पानांची आहे) पूरन कुमार यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी बेकायदेशीर पदोन्नती, जातीय भेदभाव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशासकीय छळ यांसारख्या मुद्द्यांवरून वाद असल्याचे नमूद केले आहे. त्यांनी अनुसूचित जातीच्या आयपीएस अधिकाऱ्यांविरुद्ध पक्षपाती वागणूक होत असल्याची नाराजी व्यक्त केली होती आणि याबाबत मुख्यमंत्री व गृह मंत्रालयाला पत्रे लिहून तक्रारी केल्याचेही इंडिया टुडेच्या वृत्तात म्हटले आहे.

चंदीगडच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) कंवरदीप कौर यांनी सुसाइड नोटची फॉरेन्सिक तपासणी सुरू असून तपास पूर्ण झाल्यावरच ती सार्वजनिक केली जाईल, असे सांगितले आहे. पूरन कुमार यांच्या पत्नी अमनीत पी. कुमार यांच्या तक्रारीवरून चंदीगड पोलिसांनी डीजीपी (DGP) शत्रुजीत कपूर यांच्यासह १३ हून अधिक अधिकारी आणि इतरांविरुद्ध आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे आणि एससी/एसटी (अत्याचार प्रतिबंधक) कायद्या अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला प्रश्न

या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया ‘एक्स’ (X) हँडलवर ट्विट करून प्रशासकीय व्यवस्थेतील जातीय भेदभावावर तीव्र टीका केली आहे.

आंबेडकर यांनी म्हटले आहे की, “दलित आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार यांची दुःखद आत्महत्या हा स्पष्ट पुरावा आहे की शहरी भागातील जातीय भेदभाव आता ना तर शांत आहे, ना अदृश्य.” पूरन यांची पत्नी आयएएस अधिकारी असूनही ते जातीय भेदभावातून वाचू शकले नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

या निमित्ताने त्यांनी उच्च पदांवर कार्यरत असलेल्या दलित अधिकारी, प्राध्यापक, अभियंते यांना थेट प्रश्न विचारले
आहेत:

  • तुम्हाला अजूनही असे वाटते का की आपल्याला आंबेडकरवादी चळवळीची गरज नाही?
  • तुमच्या आर्थिक प्रगतीने तुम्हाला जातीय भेदभावापासून सुरक्षित केले आहे?
  • तुम्ही अजूनही आंबेडकरवादी पक्षांना दुर्लक्षित करत राहणार का?
प्रकाश आंबेडकर यांनी या सर्वांना पुन्हा आंबेडकरवादी चळवळीशी जोडले जाण्याचे, पत्रकारिता आणि राजकारणात योगदान देण्याचे आवाहन केले आहे. तसेच, मुला-मुलींनाही चळवळीशी जोडण्यासाठी तयार करा, अन्यथा त्यांनाही तोच जातीय अन्याय सहन करावा लागेल, अशी गंभीर चेतावनी त्यांनी दिली आहे.

       
Tags: CasteipsPrakash Ambedkarpuran-kumarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

फिलिपाइन्सला पुन्हा भूकंपाचा तडाखा; रिश्टर स्केलवर ७.६ तीव्रतेचे धक्के, त्सुनामीचा इशारा जारी

Next Post

भारतीय संविधान आणि राष्ट्र पुरूषांची विटंबना करणाऱ्या बार्टी मधील अर्बन नक्षली विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – राजेंद्र पातोडे

Next Post
भारतीय संविधान आणि राष्ट्र पुरूषांची विटंबना करणाऱ्या बार्टी मधील अर्बन नक्षली विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - राजेंद्र पातोडे.

भारतीय संविधान आणि राष्ट्र पुरूषांची विटंबना करणाऱ्या बार्टी मधील अर्बन नक्षली विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - राजेंद्र पातोडे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
'हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही'; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
बातमी

‘हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही’; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

by mosami kewat
March 24, 2026
0

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय देताना स्पष्ट केले आहे की, अनुसूचित जातीतील (SC) एखाद्या व्यक्तीने हिंदू, शीख...

Read moreDetails
दिल्लीला वेढा घालुया!

दिल्लीला वेढा घालुया!

March 24, 2026
निवडणूक आयोगावर ‘भाजपचा शिक्का’! केरळमध्ये लोकशाहीच्या विश्वासाला तडा?

निवडणूक आयोगावर ‘भाजपचा शिक्का’! केरळमध्ये लोकशाहीच्या विश्वासाला तडा?

March 24, 2026
वाजेगाव ईदगाह परिसरातील घटनेवर वंचित बहुजन आघाडीची पुढाकार; निष्पक्ष, पारदर्शक आणि वैज्ञानिक चौकशीची मागणी

वाजेगाव ईदगाह परिसरातील घटनेवर वंचित बहुजन आघाडीची पुढाकार; निष्पक्ष, पारदर्शक आणि वैज्ञानिक चौकशीची मागणी

March 24, 2026
टुकार भोसले ची राजकीय भोंदूगिरी…

टुकार भोसले ची राजकीय भोंदूगिरी…

March 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home