Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home क्रीडा

Federation Cup Athletics Championship : रांचीत इतिहास घडला! गुरिंदरवीरने रचला नवा राष्ट्रीय विक्रम, फेडरेशन कपमध्ये सुवर्णपदक

mosami kewat by mosami kewat
May 24, 2026
in क्रीडा, बातमी, सामाजिक
0
रांचीत इतिहास घडला! गुरिंदरवीरने रचला नवा राष्ट्रीय विक्रम, फेडरेशन कपमध्ये सुवर्णपदक

रांचीत इतिहास घडला! गुरिंदरवीरने रचला नवा राष्ट्रीय विक्रम, फेडरेशन कपमध्ये सुवर्णपदक

       

Federation Cup Athletics Championship : रांची येथे पार पडलेल्या फेडरेशन कप अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय धावपटूंनी वेगाची नवी परिभाषाच लिहिली. पंजाबच्या गुरिंदरवीर सिंगने पुरुषांच्या १०० मीटर शर्यतीत केवळ सुवर्णपदक जिंकले नाही, तर भारतीय अॅथलेटिक्सच्या इतिहासात अभूतपूर्व असा विक्रम नोंदवत देशातील सर्वात वेगवान धावपटू बनण्याचा मान पटकावला.

शनिवारी झालेल्या अंतिम फेरीत गुरिंदरवीरने १०.०९ सेकंदांची वादळी धाव घेत ‘१०.१० सेकंद’ ही भारतीय स्प्रिंटमधील ऐतिहासिक मर्यादा प्रथमच पार केली. याआधी भारतातील कोणत्याही धावपटूला हा टप्पा गाठता आला नव्हता. त्यामुळे रांचीच्या ट्रॅकवर भारतीय अॅथलेटिक्ससाठी एक नवे पर्व सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे.

Also Read : अमेरिका-इराण युद्धाचा फटका भारताला; पेट्रोल-डिझेल दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले

या स्पर्धेत ओडिशाचा अनिमेश कुजूरनेही शानदार कामगिरी करत १०.२० सेकंदांची वेळ नोंदवली आणि रौप्यपदक पटकावले. तर प्रणव प्रमोदने १०.२९ सेकंदांसह तिसरे स्थान मिळवले.

विशेष म्हणजे, गेल्या दोन दिवसांत गुरिंदरवीर आणि अनिमेश यांच्यात राष्ट्रीय विक्रमासाठी अक्षरशः चुरशीची लढत पाहायला मिळाली. २२ मे रोजी उपांत्य फेरीत गुरिंदरवीरने १०.१७ सेकंदांची वेळ नोंदवत राष्ट्रीय विक्रम आपल्या नावे केला. पण काही मिनिटांतच अनिमेशने १०.१५ सेकंदांची धाव घेत तो विक्रम मोडीत काढला.

Also Read : कॉकरोच जनता पार्टी’ चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या कुटुंबियांना धमकी ; ॲड. प्रकाश आंबेडकरांनी साधला संवाद

मात्र अंतिम फेरीत गुरिंदरवीरने जोरदार पुनरागमन करत सर्वांनाच मागे टाकले. १०.०९ सेकंदांची ऐतिहासिक वेळ नोंदवत त्याने राष्ट्रीय विक्रम पुन्हा आपल्या नावे केला आणि आगामी राष्ट्रकुल तसेच आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.


       
Tags: 100m SprintAthletics ChampionshipAthletics IndiaFastest IndianFederation Cup 2026Gold medalGurinderveer SinghNational RecordRanchisportsSprint King
Previous Post

अमेरिका-इराण युद्धाचा फटका भारताला; पेट्रोल-डिझेल दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले

Next Post

मोदी अमेरिकेच्या तालावर नाचत आहेत – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
मोदी अमेरिकेच्या तालावर नाचत आहेत – ॲड. प्रकाश आंबेडकर

मोदी अमेरिकेच्या तालावर नाचत आहेत - ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पवनचक्की प्रकल्पांविरोधात शेतकरी व ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण; चौकशी व नुकसानभरपाईची मागणी
बातमी

पवनचक्की प्रकल्पांविरोधात शेतकरी व ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण; चौकशी व नुकसानभरपाईची मागणी

by mosami kewat
August 14, 2026
0

नंदुरबार : तालुक्यातील कोळदा, भागसरी, खोंडामळी, विखरण, कलमाडी, कानडदा, सिंदगव्हाण, भालेर, नगाव, काकदें, जुनमोहीदे आणि हाटामोहीदे या गावांच्या परिसरात सुरू...

Read moreDetails
धीरज परदेशी हत्येचा निषेध : चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

धीरज परदेशी हत्येचा निषेध : चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

August 14, 2026
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणानंतर ‘शुद्धी हवन’; VBA चे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले, “जातीवाद आणि अस्पृश्यता आजही जिवंत”

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणानंतर ‘शुद्धी हवन’; VBA चे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले, “जातीवाद आणि अस्पृश्यता आजही जिवंत”

August 14, 2026
शेवगाव : बालमटाकळी येथे मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

शेवगाव : बालमटाकळी येथे मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

August 14, 2026
बसवन संगोगी येथील जिल्हा परिषद मराठी-कन्नड प्राथमिक शाळेची दुरवस्था; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

बसवन संगोगी येथील जिल्हा परिषद मराठी-कन्नड प्राथमिक शाळेची दुरवस्था; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

August 14, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home