Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

भारतीय संविधान विचार जागर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

mosami kewat by mosami kewat
January 21, 2026
in बातमी, सामाजिक
0
भारतीय संविधान विचार जागर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
       

संविधानाची जाण – समृद्ध राष्ट्रनिर्मितीचा पाया

हिंगोली : “संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण करते” या प्रेरणादायी भावनेतून यशवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, शिरड शहापूर यांच्या वतीने शिरड शहापूर व परिसरातील शाळांमध्ये भारतीय संविधान या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

ही स्पर्धा शिरड शहापूर जिल्हा परिषद प्रशाला माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक शाळा, श्री शांती विद्यामंदिर माध्यमिक शाळा, काठोडा तांडा, शेंदूरसना व शिरला येथील जिल्हा परिषद शाळा येथे उत्साहात पार पडली. संविधानाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, लोकशाही मूल्यांची ओळख व्हावी आणि नागरिकत्वाची जाणीव वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली होती.

संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी  हिंगोली अनिल कांबळे यांनी प्रत्येक शाळेस भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला व स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला असून एकूण ११०० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.

या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहभागी शाळांतील शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले. स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रत्येक शाळेत करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष अनिल कांबळे यांनी दिली.

हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांची रुजवण करणारा ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. संस्थेचे स्वयंसेवक 

आनंद ढेंबरे, शामसुंदर ठोंबरे, विकी सूर्यतळ, यश राठोड, दीपक सूर्यतळ, गजानन बिचेवार, चक्रवर्ती जगताप, राजू मुकाडे, यशवंत कांबळे, लक्ष्मण मोगल यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.


       
Tags: awarenessElectionHingoliIndian Constitution AwarenessMaharashtraPoliticalStudentsVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

नांदेडमध्ये बॅनर लावणाऱ्या कार्यकर्त्याच्या पत्नीला वंचितने केले नगरसेवक !

Next Post

जातीय द्वेषातून भोगावात ४० एकर ऊस खाक; ‘वंचित’ आक्रमक, तहसीलवर धडक मोर्चा

Next Post
जातीय द्वेषातून भोगावात ४० एकर ऊस खाक; ‘वंचित’ आक्रमक, तहसीलवर धडक मोर्चा

जातीय द्वेषातून भोगावात ४० एकर ऊस खाक; 'वंचित' आक्रमक, तहसीलवर धडक मोर्चा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नागपुरात 23 मार्चला आरएसएस मुख्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचा शांततापूर्ण मोर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सवालांचा भडिमार
बातमी

नागपुरात 23 मार्चला आरएसएस मुख्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचा शांततापूर्ण मोर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सवालांचा भडिमार

by mosami kewat
March 23, 2026
0

नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी 19 मार्च 2026 रोजी केलेल्या ट्विटमधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या...

Read moreDetails
नागपूरात वंचित बहुजन आघाडीचा आक्रमक मोर्चा; फलकांमधून केंद्र सरकार व RSSवर तीव्र टीका

नागपूरात वंचित बहुजन आघाडीचा आक्रमक मोर्चा; फलकांमधून केंद्र सरकार व RSSवर तीव्र टीका

March 23, 2026
वंचित बहुजन आघाडीचे आज नागपुरात आंदोलन; कायदा-सुव्यवस्थेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

वंचित बहुजन आघाडीचे आज नागपुरात आंदोलन; कायदा-सुव्यवस्थेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

March 23, 2026
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्याकडून नागपूर येथील संयुक्त मोर्चा स्थळाची पाहणी

वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्याकडून नागपूर येथील संयुक्त मोर्चा स्थळाची पाहणी

March 22, 2026
ओबीसी चळवळीतील लढवय्या नेता शब्बीर अन्सारी यांचे निधन; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भावपूर्ण आदरांजली

ओबीसी चळवळीतील लढवय्या नेता शब्बीर अन्सारी यांचे निधन; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भावपूर्ण आदरांजली

March 22, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home