Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

जातीय द्वेषातून भोगावात ४० एकर ऊस खाक; ‘वंचित’ आक्रमक, तहसीलवर धडक मोर्चा

mosami kewat by mosami kewat
January 22, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
जातीय द्वेषातून भोगावात ४० एकर ऊस खाक; ‘वंचित’ आक्रमक, तहसीलवर धडक मोर्चा
       

जालना : जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मौजे भोगाव येथे जातीय द्वेषातून बौद्ध समाजाच्या शेतकऱ्यांची तब्बल ४० एकर ऊस शेती जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणातील पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने घनसावंगी तहसील कार्यालयासमोर आक्रमक निदर्शने करत जोरदार आंदोलन केले. 

​नेमकी घटना काय?

​मिळालेल्या माहितीनुसार, भोगाव येथील बौद्ध समाजाच्या शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस अज्ञात समाजकंटकांनी जातीय मानसिकतेतून पेटवून दिला. यामध्ये सुमारे ४० एकर ऊस जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरली आहे. 

​आंदोलनादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी आरोप केला की, “जळालेला ऊस कारखान्यापर्यंत नेण्यासाठी साखर कारखान्याचे चेअरमन आणि संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक विलंब करत आहेत. तसेच, या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्यासही पोलीस प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे.”

​तहसीलदारांना निवेदन सादर करताना आंदोलकांनी स्पष्ट इशारा दिला की, जर पीडित शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळाला नाही आणि आरोपींना त्वरित बेड्या ठोकल्या गेल्या नाहीत, तर वंचित बहुजन आघाडी राज्यभर अधिक तीव्र आंदोलन छेडेल.

​या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके, जिल्हाध्यक्ष रामप्रसाद थोरात, परमेश्वर खरात, देविदास कोळे, चोखाजी सौंदर्य, हनुमंत मोरे, समाधान तोडके, बाबासाहेब गालफडे, बाबासाहेब सोनवणे, सतीश पट्टेकर, संतोष येडे, गौतम पटेकर यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाचे पदाधिकारी व शेकडो महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


       
Tags: MaharashtraPoliticalpoliticsVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

भारतीय संविधान विचार जागर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

सत्तेसाठी ‘काहीही’! अचलपूरमध्ये भाजप-MIMची युती

Next Post
सत्तेसाठी ‘काहीही’! अचलपूरमध्ये भाजप-MIMची युती

सत्तेसाठी 'काहीही'! अचलपूरमध्ये भाजप-MIMची युती

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !
बातमी

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !

by mosami kewat
September 21, 2026
0

- संजीव चांदोरकर वित्त भांडवलाच्या युगात, स्थापनेनंतर फक्त २५ वर्षाच्या कालावधीत पूर्ण देशभर फूटप्रिंट असणारा भागभांडवलाचा पंथ (  इक्विटी कल्ट) ...

Read moreDetails
सलीम अली सरोवराच्या सुशोभीकरणासाठी महापौर-आयुक्तांची पाहणी; जावेद कुरेशी यांच्या प्रयत्नांना यश

सलीम अली सरोवराच्या सुशोभीकरणासाठी महापौर-आयुक्तांची पाहणी; जावेद कुरेशी यांच्या प्रयत्नांना यश

September 21, 2026
आयआयटी मुंबई हे दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे केंद्र बनले आहे – सुजात आंबेडकर 

आयआयटी मुंबई हे दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे केंद्र बनले आहे – सुजात आंबेडकर 

September 21, 2026
शेतक-याची लूट आणि कॉर्पोरेट उद्योगांना पायघड्या!

शेतक-याची लूट आणि कॉर्पोरेट उद्योगांना पायघड्या!

September 21, 2026
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home