Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

सत्तेसाठी ‘काहीही’! अचलपूरमध्ये भाजप-MIMची युती

mosami kewat by mosami kewat
January 22, 2026
in Uncategorized, बातमी, राजकीय, सामाजिक
0
सत्तेसाठी ‘काहीही’! अचलपूरमध्ये भाजप-MIMची युती
       

​अमरावती: ‘राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो’ या उक्तीचा प्रत्यय अनेकदा येतो, मात्र अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदेत जे घडले, त्याने राजकीय संस्कृतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कट्टर वैचारिक विरोधक आणि एकमेकांचे ‘राजकीय शत्रू’ समजले जाणारे भाजप (BJP) आणि एमआयएम (MIM) सत्तेच्या सारीपाटावर चक्क एकाच जहाजात स्वार झाले आहेत. या युतीमुळे राजकीय वर्तुळातून तीव्र संताप आणि टिकेची झोड उठली आहे.

​आतापर्यंत निवडणुकांच्या सभांमध्ये एकमेकांवर आगपाखड करणारे, एकमेकांच्या विचारधारेला देशहितासाठी घातक ठरवणारे हे दोन्ही पक्ष सत्तेसाठी इतक्या टोकाला जातील, अशी कल्पनाही सामान्य मतदाराने केली नव्हती. अचलपूर नगरपरिषदेत सभापती पदाच्या निवडीसाठी भाजपने एमआयएमची साथ घेतली, तर बदल्यात एमआयएमच्या नगरसेवकाला शिक्षण आणि क्रीडा समितीचे सभापती पद बहाल करण्यात आले.

​अचलपूरमध्ये एमआयएमचे ३, अजित पवार गटाचे २ आणि ३ अपक्ष नगरसेवकांनी एकत्र येत भाजपला पाठिंबा दिला. या युतीचे पडसाद आता सोशल मीडिया आणि सर्वसामान्य जनतेत उमटू लागले आहेत. ​हिंदुत्वाचा अजेंडा कुठे गेला? असा सवाल भाजपच्या मतदारांकडून विचारला जात आहे.

‘भाजपसोबत कधीही जाणार नाही’ असे ठणकावून सांगणारे असदुद्दीन ओवेसी आता आपल्या नगरसेवकांच्या या निर्णयावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तसेच केवळ खुर्ची मिळवण्यासाठी टोकाच्या विचारधारेच्या पक्षांशी हातमिळवणी करणे, हा मतदारांचा विश्वासघात असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

​”ज्या पक्षांना आम्ही एकमेकांचे कट्टर शत्रू मानून मतदान केले, तेच आज सत्तेसाठी गळ्यात गळे घालून फिरत आहेत. हा लोकशाहीचा आणि मतदारांच्या विचारांचा अपमान आहे. याचे उत्तर एमआयएम पक्ष आणि इम्तियाज जलील यांनी द्यावे.”

– रशीद शेख, नागरिक, अचलपूर


       
Tags: AIMIMalliancebjpPoliticalpolticsvbaforindia
Previous Post

जातीय द्वेषातून भोगावात ४० एकर ऊस खाक; ‘वंचित’ आक्रमक, तहसीलवर धडक मोर्चा

Next Post

महाराष्ट्र महानगरपालिका आरक्षण सोडत जाहीर: मुंबई, पुणे, नागपूर ‘सर्वसाधारण’ तर ठाणे ‘SC’ साठी राखीव

Next Post
महाराष्ट्र महानगरपालिका आरक्षण सोडत जाहीर: मुंबई, पुणे, नागपूर ‘सर्वसाधारण’ तर ठाणे ‘SC’ साठी राखीव

महाराष्ट्र महानगरपालिका आरक्षण सोडत जाहीर: मुंबई, पुणे, नागपूर 'सर्वसाधारण' तर ठाणे 'SC' साठी राखीव

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी
बातमी

हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी

by mosami kewat
September 7, 2026
0

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील शासकीय व निमशासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध आहेत का, याची पाहणी...

Read moreDetails
मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

September 7, 2026
सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

September 7, 2026
विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

September 7, 2026
तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा 'Gen-Z' कनेक्ट

तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा ‘Gen-Z’ कनेक्ट

September 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home