अकोला: बाळापूर तालुक्यातील भरतपूर येथे कॉर्नर संवाद बैठक आयोजित केली असता वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले.
अंजलीताई म्हणाल्या, जाती ही निसर्गाने निर्माण केली नाही ती माणसाने केली. संविधानाने आपल्या जातीपाती नष्ट केल्या, सर्वांना समान संधी दिली, स्त्री असो वा पुरुष सर्व संविधानासामोर समान आहेत. जर भारतीय संविधान बदलल्या गेले तर आपण 100 वर्ष मागे जाऊ, हे होऊ न देण्यासाठी आपल्याला मतदान करायचे आहे. आतापर्यंत संविधानाने आपले रक्षण केले आहे, आज आपल्याला संविधानाचे रक्षण केले पाहिजे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
त्यासाठी आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला मतदान करावे, वंचितचे आश्वासन आहे पिकाला हमीभाव, तात्काळ नुकसान भरपाई जाग्यावर देवू, असेही त्या म्हणाल्या.
या प्रसंगी जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांनी सामान्य माणसाला सरपंच ते ZP अध्यक्ष बनवण्याचे काम बाळासाहेब आंबेडकर यांनी केले यांची आठवण करून दिली.
तसेच पुष्पाताई इंगळे, प्रभाताई सिरसाठ, ता.अध्यक्ष जानकीराम खारोडे, महासचिव चंद्रकात पाटील, माजी सभापती सोनटक्के ताई, रूपालीताई गवई, मायाताई लोथ, राजेंद्र घुगरे आणि सुमेध अंभोरे यांच्यासह गावातील जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते