मुंबई: महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षण या मुद्द्यावरून ओबीसी आणि मराठा यांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. यातच राज्य राज्यमागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्या. आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देण्याचे कारण त्यांनी सांगितले आहे की, सरकारमधील दोन मंत्री हस्तक्षेप करत आहेत.
यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, दोन उपमुख्यमंत्र्यांनी मेंदू चा वापर करण्याऐवजी ताकदीचा वापर केल्याचे हे परिणाम आहेत.
बुद्धी ऐवजी जर गुडघ्याच्या वापर केला तर अशा घटना घडणे निश्चित असते. असेही त्यांनी त्यात म्हटले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्य मागासवर्ग आयोगातील बबनराव तायवाडे, संजय सोनावणे, लक्ष्मण हाके, बी एल किल्लारीकर या सदस्यांनी सरकारी हस्तक्षेपाचे कारण देत राजीनामे दिले होते.
ओबीसी, मराठा आरक्षणावरून वाद होत असतांना ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठयांना स्वतंत्र कायदेशीर आरक्षण देता येईल व त्याचा फॉर्म्युला आमच्याकडे असल्याचेही म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर या ट्विटला महत्त्व आहे.