Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

स्वतंत्र लढलो, तर आम्ही लोकसभेच्या 6 जागा जिंकू

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 1, 2024
in राजकीय
0
स्वतंत्र लढलो, तर आम्ही लोकसभेच्या 6 जागा जिंकू
       
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला विश्वास

नागपूर: आम्ही स्वतंत्र लढलो, तर किमान 6 लोकसभेच्या जागा जिंकू शकतो, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नागपूर येथे रवी भवनला झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्ही 42 मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या आहेत, त्यामध्ये आमच्या विचारांचे लोक किती आहेत हे दिसून आले आहे. विशेष म्हणजे कोणत्याही सभेत आम्ही जेवण देत नाही, गाड्या देत नाही. मात्र, तरीदेखील सभेला येणारा माणूस स्वतःच्या पैशाने येतो, स्वतःची शिदोरी घेऊन येतो. तसेच, बजेटवर बोलताना ते म्हणाले की, आपण या बजेटमध्ये पाहिलं, तर सामाजिक सुधारणेचे कार्यक्रम जे आहेत किंवा सामाजिक कल्याणच्या योजना आहेत त्या कमी करण्यात आलेल्या आहेत. यामुळे दारिद्र्य रेषेखाली जगणाऱ्या माणसाचे आयुष्य हालाकीचे झाले असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

हे सरकार आरएसएसचे आहे, हे भौगोलिक सीमा मानत नाहीत, राष्ट्रीय सीमा मानत नाहीत, तर ते सांस्कृतिक सिमांची चर्चा करतात. तेव्हा, या सांस्कृतिक सीमा विस्तारीत करण्यासाठी भारताला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा डाव चाललाय का ? हे इथल्या विचारवंतांनी तपासल पाहिजे आणि निवडणुकीपूर्वी लोकांसमोर मांडण्याची आवश्यकता असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

तसेच, आंबेडकर म्हणाले की, आम्ही 48 च्या 48 जागांवर ताकदीने लढू शकतो. 48 पैकी 2 जागा जर सोडल्या, तर 2.5 लाखांच्यावर आमची ताकद असल्याचा विश्वास त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

Tags: CongressmahavikasaghadiNCPPrakash AmbedkarShivsenaVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

हिंगोली येथील आदर्श महाविद्यालयातील ‘थाळी बजाव आंदोलन’ स्थगित

Next Post

‘त्या’ जागांवरून मविआतील काँग्रेस – शिवसेनेत वाद !

Next Post
‘त्या’ जागांवरून मविआतील काँग्रेस – शिवसेनेत वाद !

'त्या' जागांवरून मविआतील काँग्रेस - शिवसेनेत वाद !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आरएसएसविरोधात वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादेत ‘जन आक्रोश मोर्चा’ ; घोषणाबाजीसह मोठी गर्दी
बातमी

आरएसएसविरोधात वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादेत ‘जन आक्रोश मोर्चा’ ; घोषणाबाजीसह मोठी गर्दी

by mosami kewat
October 24, 2025
0

औरंगाबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विरोधात वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य समितीने आज औरंगाबाद शहरात 'जन आक्रोश मोर्चा'चे आयोजन...

Read moreDetails
अहमदनगरमध्ये मातंग समाजाच्या तरुणाला अमानुष मारहाण ; हात-पाय मोडले, शरीरावर लघुशंका आरोपींवर ‘मकोका’ लावण्याची ॲड. प्रकाश आंबेडकरांची मागणी

अहमदनगरमध्ये मातंग समाजाच्या तरुणाला अमानुष मारहाण ; हात-पाय मोडले, शरीरावर लघुशंका आरोपींवर ‘मकोका’ लावण्याची ॲड. प्रकाश आंबेडकरांची मागणी

October 23, 2025
वंचित बहुजन आघाडीचा ‘जन आक्रोश मोर्चा’ पूर्वसंध्येला औरंगाबाद पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप; RSS ला सरकारी खर्चातून सुरक्षा का? – प्रश्नांची लेखी उत्तरे मागितली

वंचित बहुजन आघाडीचा ‘जन आक्रोश मोर्चा’ पूर्वसंध्येला औरंगाबाद पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप; RSS ला सरकारी खर्चातून सुरक्षा का? – प्रश्नांची लेखी उत्तरे मागितली

October 23, 2025
अंतराळ संशोधनातील दीपस्तंभ डॉ. एकनाथ वसंत चिटणीस यांचे दुखद निधन; वयाची शंभरी ओलांडलेला तारा निखळला

अंतराळ संशोधनातील दीपस्तंभ डॉ. एकनाथ वसंत चिटणीस यांचे दुखद निधन; वयाची शंभरी ओलांडलेला तारा निखळला

October 22, 2025
जनआक्रोश मोर्च्याला पोलिसांनी परवानगी नाकारली; RSS च्या ऑफिसवर मोर्चा निघणारच – अमित भुईगळ

जनआक्रोश मोर्च्याला पोलिसांनी परवानगी नाकारली; RSS च्या ऑफिसवर मोर्चा निघणारच – अमित भुईगळ

October 22, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home