Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आसाममध्ये सुखोई-३० कोसळले; दोन शूर वैमानिकांना वीरमरण

mosami kewat by mosami kewat
March 6, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
आसाममध्ये सुखोई-३० कोसळले; दोन शूर वैमानिकांना वीरमरण
       

गुवाहाटी: भारतीय हवाई दलाचे (IAF) सामर्थ्य मानले जाणारे सुखोई-३० एमकेआय हे लढाऊ विमान आसाममध्ये कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात हवाई दलाचे दोन तरुण अधिकारी, स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर यांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले.

गुरुवारी सायंकाळी आसाममधील जोरहाट हवाई तळावरून या विमानाने नियमित प्रशिक्षण मोहिमेसाठी उड्डाण केले होते. रात्री ७:४२ वाजता या विमानाचा रडारशी असलेला संपर्क तुटला आणि विमान बेपत्ता झाले. त्यानंतर तातडीने शोधमोहीम राबवण्यात आली. आसाममधील कार्बी आंगलाँग जिल्ह्यातील बोकाजन उपविभागातील चोकीहोला जंगल परिसरात हे विमान कोसळले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार बचाव पथक घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत दोन्ही वैमानिकांनी अखेरचा श्वास घेतला होता.

भारतीय हवाई दलाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या घटनेची अधिकृत माहिती दिली. हवाई दलाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या कठीण प्रसंगी हवाई दलातील सर्व कर्मचारी शोकाकुल कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. देशाने दोन कर्तबगार वैमानिक गमावले असून, त्यांच्या सर्वोच्च बलिदानाचा आम्हाला अभिमान आहे.

रशियन बनावटीचे सुखोई-३० एमकेआय हे दोन आसनी, बहुउद्देशीय लढाऊ विमान भारतीय हवाई दलाचा कणा मानले जाते. २००० च्या दशकापासून हे विमान हवाई दलात कार्यरत असून सध्या भारताकडे अशा २०० हून अधिक विमानांचा ताफा आहे.


       
Tags: FighterFighter jetIAFSukhoi
Previous Post

अकोला महानगरपालिकेत ‘वंचित’ चे सोशल इंजिनिअरिंग; माहेश्वरी समाजाचे सुनिल इन्नानी यांना स्वीकृत सदस्यपदासाठी संधी

Next Post

अकोला महानगरपालिकेत ‘वंचित’ चे सोशल इंजिनिअरिंग; माहेश्वरी समाजाचे सुनिल इन्नानी यांना स्वीकृत सदस्यपदासाठी संधी

Next Post
अकोला महानगरपालिकेत ‘वंचित’ चे सोशल इंजिनिअरिंग; माहेश्वरी समाजाचे सुनिल इन्नानी यांना स्वीकृत सदस्यपदासाठी संधी

अकोला महानगरपालिकेत 'वंचित' चे सोशल इंजिनिअरिंग; माहेश्वरी समाजाचे सुनिल इन्नानी यांना स्वीकृत सदस्यपदासाठी संधी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
BCCIचा बिग प्लॅन; कोहली-रोहित पुन्हा मैदानात, वनडेत रंगणार लढत
क्रीडा

BCCIचा बिग प्लॅन; कोहली-रोहित पुन्हा मैदानात, वनडेत रंगणार लढत

by Akash Shelar
March 27, 2026
0

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ Board of Control for Cricket in India (BCCI) ने टीम इंडियाच्या आगामी घरच्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर...

Read moreDetails
पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीचा ७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीचा ७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

March 26, 2026
‘वंचित’च्या नगरसेवकाकडून इम्तियाज जलील यांना १ कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस

‘वंचित’च्या नगरसेवकाकडून इम्तियाज जलील यांना १ कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस

March 26, 2026
औरंगाबादमध्ये इंधन खरेदीवर मर्यादा !

औरंगाबादमध्ये इंधन खरेदीवर मर्यादा !

March 26, 2026
आंध्र प्रदेशात भीषण अपघात: बसला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू, २२ प्रवासी जखमी

आंध्र प्रदेशात भीषण अपघात: बसला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू, २२ प्रवासी जखमी

March 26, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home