Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘वंचित’च्या नगरसेवकाकडून इम्तियाज जलील यांना १ कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस

mosami kewat by mosami kewat
March 26, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
‘वंचित’च्या नगरसेवकाकडून इम्तियाज जलील यांना १ कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस
       
औरंगाबाद : रमाई आवास योजनेवरून राजकीय वाद पेटला आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महानगरपालिके अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या योजनेत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांमध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या काही नगरसेवकांची नावे घेतल्याने प्रकरण अधिकच तापले आहे. मात्र, या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेत आरोप फेटाळून लावले आहे. 

जलील यांनी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक अमित भुईगळ यांच्यावर राजकीय द्वेषाने बोट ठेवले होते. खोट्या कागदपत्रांच्या आधारे दलित समाजातील लाभार्थ्यांच्या नावावर प्रत्येकी सुमारे अडीच लाख रुपयांचे अनुदान काढून गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला. (Vanchit bahujan aghadi)

या आरोपांना उत्तर देताना अमित भुईगळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी वकिलामार्फत इम्तियाज जलील यांना एक कोटी रुपयांची अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली असून, आरोप सूडबुद्धीने केल्याचे म्हटले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये अपेक्षित मतदान न मिळाल्यामुळे जलील हे दलित समाजावर आणि वंचित गटांवर निशाणा साधत असल्याचेही त्यांनी म्हटले. (Vanchit bahujan aghadi)

भुईगळ यांनी पुढे सांगितले की, ते सातत्याने गोरगरिबांसाठी काम करत असून मतदारांनी त्यांना पुन्हा निवडून दिले आहे. तसेच आंबेडकरी समाजाच्या मोर्चात सहभागी झाल्यामुळे जलील यांना वैयक्तिक राग असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Tags: Amit bhuigalaurangabadImtiazJaleelNoticeVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

औरंगाबादमध्ये इंधन खरेदीवर मर्यादा !

Next Post

पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीचा ७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Next Post
पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीचा ७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीचा ७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी
बातमी

हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी

by mosami kewat
September 7, 2026
0

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील शासकीय व निमशासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध आहेत का, याची पाहणी...

Read moreDetails
मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

September 7, 2026
सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

September 7, 2026
विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

September 7, 2026
तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा 'Gen-Z' कनेक्ट

तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा ‘Gen-Z’ कनेक्ट

September 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home