Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आंध्र प्रदेशात भीषण अपघात: बसला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू, २२ प्रवासी जखमी

mosami kewat by mosami kewat
March 26, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
आंध्र प्रदेशात भीषण अपघात: बसला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू, २२ प्रवासी जखमी
       

आंध्र प्रदेश : मार्कापुरम जिल्ह्यातील रायवरम परिसरात गुरुवारी पहाटे एक भीषण अपघात घडला. खासगी ट्रॅव्हल्सची बस आणि डंपर यांच्यात झालेल्या धडकेनंतर बसला आग लागून 13 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, हरिकृष्णा ट्रॅव्हल्सची बस तेलंगणातील निर्मल येथून नेल्लोरकडे जात होती. पहाटे सुमारे सहाच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर बसला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला सुमारे तीन तासांची कसरत करावी लागली. (Andhra Pradesh Bus Inferno)

मार्कापुरमचे पोलीस अधीक्षक व्ही. हर्षवर्धन राजू यांनी सांगितले की, या दुर्घटनेत डंपर चालकासह 22 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताच्या वेळी बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते. घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

याआधी 25 डिसेंबर 2025 रोजी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथेही असाच भीषण अपघात झाला होता. एका भरधाव लॉरीने डिव्हायडर ओलांडून समोरून येणाऱ्या ‘सीबर्ड ट्रान्सपोर्ट’च्या स्लीपर बसला धडक दिली. (Andhra Pradesh Bus Inferno)

या धडकेनंतर बसला आग लागली आणि त्यात 6 जण जिवंत जळाले. मृतांमध्ये 4 महिला, एक लहान मूल आणि लॉरी चालकाचा समावेश होता. अपघाताच्या वेळी बहुतांश प्रवासी झोपेत असल्याने त्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. दोन्ही घटनांमुळे रस्ते सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.


       
Tags: accidentAndhra Pradesh Bus InfernoAndhrapradeshBus accidentBus Fire
Previous Post

नागपूरची ठिणगी !

Next Post

औरंगाबादमध्ये इंधन खरेदीवर मर्यादा !

Next Post
औरंगाबादमध्ये इंधन खरेदीवर मर्यादा !

औरंगाबादमध्ये इंधन खरेदीवर मर्यादा !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी
बातमी

मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

by mosami kewat
September 29, 2026
0

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय मतदारांना वगळण्याचा डाव असल्याचा राजेंद्र पातोडे यांचा आरोप मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष...

Read moreDetails
शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 29, 2026
रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

रात्रीचा ड्रोन सर्व्हे म्हणजे सरकारची राजकीय बदमाशी; दुष्काळाच्या वस्तुस्थितीशी खेळ थांबवा

September 29, 2026
वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

September 28, 2026
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

September 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home