मुंबई : कर्नाटकच्या भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे याने जे वक्तव्य केले आहे, त्या वक्तव्याचे मला नवल वाटले नाही. मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की सार्वजनिकरित्या असे वक्तव्य करण्याची ही त्याची पहिली वेळ नाही. 2017 मध्येही त्याने हेच म्हटल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे. 1950 मध्ये संविधान स्वीकारल्यानंतर आरएसएसने घेतलेली ही प्रतिज्ञा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
भारतीय संविधान हटवून त्याजागी मनुस्मृती आणण्याच्या आरएसएस आणि भाजपच्या दीर्घकालीन योजनेचा हा भाग आहे. त्यांना हुकूमशाही आणायची आहे आणि स्वातंत्र्य, प्रतिष्ठा आणि धर्म स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घ्यायचा आहे. तसेच, आपल्या राष्ट्राच्या धर्मनिरपेक्षतेची रचना बदलवायची आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानाचा दाखला देत त्यांनी म्हटले आहे की, “आमचे मालक होण्यात तुमचे हित असेल पण तुमचे गुलाम होण्यात आमची इच्छा कशी असेल?”