Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

महापालिका आयुक्तांनी कर वसुली खाजगीकरणाचा अहवाल द्या.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 12, 2024
in बातमी
0
महापालिका आयुक्तांनी कर वसुली खाजगीकरणाचा अहवाल द्या.
       

अवर सचिवांचा आदेश; निलेश देव यांचे मुंबईत यशस्वी आंदोलन

अकोला : महापालिका आयुक्त सुनिल लहाने यांनी अकोला महापालिकेच्या कर वसुली खाजगीकरण करताना त्यात अनियमितता झाली असल्याच त्याची चौकशी करावी. त्याच बरोबर ज्या कामासाठी निविदा काढण्यात आली ते मालमत्ता पुनर्मुल्यांकनाचे काम स्थगित का, निविदा प्रक्रियेत तत्कालिन आयुक्तांनी काही अनियमितता केली असल्यास तसा स्वयंस्पष्ट अहवाल शासनाला द्यावा. खाजगीकरणामुळे महापालिका कर्मचाऱ्यांना काही काम राहिले की नाही याची खातरजमा करावी. त्याच बरोबर नागरिक स्वयंस्फुर्तीने कर भरत असताना कर वसुली खाजगीकरण का केले गेले. आता खाजगीकरणातून कर वसुलीची रक्कम किती, दोनच निविदा असताना टेंडर कसे देण्यात आले. कर वसुलीचा अनुभव नसताना स्वाती इंडस्ट्रिजला कर वसुली चे कंत्राट का देण्यात आले या सर्व विषयाची माहिती राज्य शासनाला द्यावी. त्याच बरोबर या विषयी आंदोलन करणारे वंचित युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते नीलेश देव यांचे प्रश्नांची गंभीर दखल घेत अकोलेकर नागरिकांना दिलासा द्यावा असे नगर विकास विभागाच्या अवर सचिव विद्या हमप्या यांनी महापालिका आयुक्त सुनिल लहाने यांना दिले आहे.

अकोला महापालिकेच्या कर वसुली खाजगीकरणाविरोधात गुरुवार ७ मार्च पासून मुंबईत आंदोलन करणाऱ्या वंचित युवानेता आणि सामाजिक कार्यकर्ता निलेश देव यांचे आंदोलन नगर विकास विभागाच्या अवर सचिव विद्या हमप्या यांनी मध्यस्थी करत सोडविण्यात आले.

नगर विकास विभागाच्या अवर सचिव यांनी मुंबईतून महापालिका आयुक्त सुनिल लहाने यांच्याशी संवाद घडवून आणला. त्याच बरोबर नीलेश देव यांना हवी असलेली सर्व माहिती लोकहितास्तव उपलब्ध करुन देत त्यांच्या रास्त मागण्याची दखल आयुक्तांनी घ्यावी असा आदेश नगर विकास विभागाच्या अवर सचिव यांनी आयुक्तांना दिला आहे.

नीलेश देव यांचे कर वसुली खाजगीकरणा विरोधात हे यशस्वी आंदोलन असल्याची चर्चा मुंबई तसेच अकोल्यातील राजकीय वर्तुळात सुरु आहे. अकोला महापालिका मालमत्ता कर खासगीकरणाविरोधात राज्य सरकारची ढिसाळ भूमिका आणि त्याच बरोबर अकोल्यातील जनतेवर लादलेले कर वसुली खासगीकरण दूर करण्यासाठी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यास गेलेले वंचितचे युवा नेते नीलेश देव व त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांना मरीन ड्राइव्ह पोलिसांनी गुरुवारी अटकाव अटकाव केला. त्यांना काही काळ स्थानबध्द करण्यात आले. अखेर आझाद मैदान पोलिसांना नीलेश देव यांना सुपूर्द करत त्यांना आझाद मैदानात आंदोलन करण्याची काही अटी घालत परवानगी दिली होती.

अखेर नीलेश देव यांनी त्यांच्या सोबत उपस्थित कार्यकर्ते नीलेश पवार, अजय शास्र्ती, राजु गुन्नलवार, राजु कनोजीया यांच्यासोबत आझाद मैदानात गेल्या गेल्या दिवसांपासून आंदोलन केले. आंदोलनस्थळी अकोलेकरांनी गर्दी करत त्यांना पाठिंबा दिला. मुख्यमंत्र्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन न करण्याची मागणी नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी नीलेश देव यांना केली होती.

नगर विकास विभागाच्या अवर सचिव विद्या हमप्या यांनी त्यांच्या दालनात वंचित युवानेता आणि सामाजिक कार्यकर्ता निलेश देव यांच्याशी अर्धा तास चर्चा करत या विषयाचे गांभीर्य समजुन घेतले. अकोलेकरांवर नाहक कर वसुलीचा बोजा चढविण्यात आल्याचे नीलेश देव यांनी शासनाच्या लक्षात आणुन दिले. नगर विकास विभागाच्या अवर सचिव विद्या हमप्या यांनी अकोला महापालिका आयुक्त सुनिल लहाने यांच्यासोबत विद्या हमप्या यांनी दूरध्वनीवर संपर्क साधत नीलेश देव यांच्या आंदोलनाची शासनाने गंभीर दखल घेतल्याचे सांगितले.

महापालिका आयुक्तांनी नीलेश देव यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर द्यावीत त्याच बरोबर शासनाला या विषयी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. वंचित युवानेता आणि सामाजिक कार्यकर्ता निलेश देव यांचे पाच दिवसांपासून मुंबईत कार्यकर्त्यांसह सुरु असलेले आंदोलनास मोठे यश प्राप्त झाल्यानंतर ते आज स्थगित करण्यात आले.


       
Tags: AkolamumbaiVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

…त्या वक्तव्याचे मला नवल वाटले नाही – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

काँग्रेसने ‘मविआ’ कडे मागणी केलेल्याजागांवर चर्चेसाठी ‘वंचित’ ने दिला प्रस्ताव

Next Post
काँग्रेसने ‘मविआ’ कडे मागणी केलेल्याजागांवर चर्चेसाठी ‘वंचित’ ने दिला प्रस्ताव

काँग्रेसने 'मविआ' कडे मागणी केलेल्याजागांवर चर्चेसाठी 'वंचित' ने दिला प्रस्ताव

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी
बातमी

‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी

by mosami kewat
September 23, 2026
0

मुंबई : साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणी न्याय मिळावा, तसेच या प्रकरणात संस्थात्मक जबाबदारी निश्चित करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन...

Read moreDetails
बिहारची ती घटना आणि ‘डब्ल्यूईएफ’चा अहवाल: एकाच नाण्याच्या दोन बाजू

बिहारची ती घटना आणि ‘डब्ल्यूईएफ’चा अहवाल: एकाच नाण्याच्या दोन बाजू

September 23, 2026
मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक; भारताची २८ वर्षांची प्रतीक्षा संपली

मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक; भारताची २८ वर्षांची प्रतीक्षा संपली

September 23, 2026
मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

September 23, 2026
पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

September 23, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home