जालना : भोकरदन येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान झालेल्या हलगर्जीपणामुळे बाधित झालेल्या खापरखेडा येथील शीला संदीप भालेराव यांची वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन विचारपूस केली.
बाळाचे ठोके तपासण्यासाठी अल्ट्रासाऊंड जेलऐवजी हायपोक्लोराईट (अॅसिड) लावण्यात आले होते. या घटनेनंतर, वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शीला भालेराव यांच्या तब्येतीची आणि नवजात बाळाच्या प्रकृतीची चौकशी केली.
सध्या भालेराव यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले आहे, ज्यामुळे कुटुंबीयांना आणि त्यांना दिलासा मिळाला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला भालेराव यांच्यावर विशेष लक्ष देऊन उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या भेटीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे भोकरदन तालुकाध्यक्ष विशाल मिसाळ, महासचिव मंगेश पगारे, अमोल पगारे, शुभम पगारे आणि अक्षय गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते. या गंभीर घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकारिणी बैठक संपन्न
लातूर : वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकारिणी, रेणापूरची महत्त्वपूर्ण बैठक तक्षशिला बुद्ध विहार, घनसारगाव येथे पार पडली. या बैठकीत सदस्य...
Read moreDetails