Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक तर्फे महाकवी वामनदादा कर्डक यांना सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे मानवंदना

mosami kewat by mosami kewat
August 17, 2025
in बातमी
0
सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक तर्फे महाकवी वामनदादा कर्डक यांना सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे मानवंदना

सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक तर्फे महाकवी वामनदादा कर्डक यांना सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे मानवंदना

नागपूर : ‘सम्यक विद्यार्थी आंदोलन’ आणि ‘वंचित बहुजन आघाडी’च्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक यांना अनोखी मानवंदना देण्यात आली. १६ ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये या निमित्ताने एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात काव्यवाचन आणि गीतांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
‎
‎या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संविधान गांगुर्डे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, उपाध्यक्ष लीना खरे, प्रवक्ते बाळासाहेब शिंदे, महिला आघाडी अध्यक्षा उर्मिला गायकवाड, नितीन भुजबळ, वामन गायकवाड, राहुल सोनवणे, सागर रिपोटे, दीपक पगारे, रवी पगारे आणि विश्वनाथ भालेराव उपस्थित होते. यानंतर, ‘सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिकची भूमिका व पुढील वाटचाल’ या विषयावर जिल्हाध्यक्ष मिहिर गजबे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
‎
‎कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात काव्यवाचनाचा सुंदर सोहळा पार पडला. सम्राट संगारे, आदित्य निर्भवणे, शुभम काळे, आशिष तेलगोटे, आणि तेजल पालवे यांनी आपल्या कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. या काव्यवाचनाचे परीक्षण कार्यक्रमाचे अध्यक्ष संविधान गांगुर्डे यांनी केले. यानंतर, धम्मगौतमी धिवरे आणि आदित्य निर्भवणे यांनी महामानवास अभिवादन गीत सादर केले. त्यांना मिहिर गजबे, आशिष तेलगोटे आणि सुरज दीक्षा सुदाम यांनी साथ दिली.
‎
‎यावेळी, नुकत्याच निवड झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणीचा सत्कार ‘सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक’च्या वतीने करण्यात आला. बाळासाहेब शिंदे, नितीन भुजबळ आणि वामन गायकवाड यांनीही मार्गदर्शनपर भाषणे दिली. तर, अध्यक्षीय भाषण संविधान गांगुर्डे यांनी केले.

Tags: nagpurvbaforindia
Previous Post

अमरावतीत वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक; बाळासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक तर्फे महाकवी वामनदादा कर्डक यांना सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे मानवंदना
बातमी

सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक तर्फे महाकवी वामनदादा कर्डक यांना सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे मानवंदना

by mosami kewat
August 17, 2025
0

नागपूर : 'सम्यक विद्यार्थी आंदोलन' आणि 'वंचित बहुजन आघाडी'च्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक यांना अनोखी मानवंदना देण्यात आली. १६ ऑगस्ट...

Read moreDetails
अमरावतीत वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक; बाळासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शन

अमरावतीत वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक; बाळासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शन

August 17, 2025
वंचित बहुजन युवा आघाडीच्या सोलापूर जिल्हा बैठकीत तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

वंचित बहुजन युवा आघाडीच्या सोलापूर जिल्हा बैठकीत तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

August 17, 2025
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वैधतेला आवाहन देणाऱ्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वैधतेला आवाहन देणाऱ्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी!

August 17, 2025
HDFC बँकेच्या नियमांमध्ये मोठे बदल: रोख व्यवहार, निधी हस्तांतरण आणि चेकबुकवर नवीन शुल्क लागू

HDFC बँकेच्या नियमांमध्ये मोठे बदल: रोख व्यवहार, निधी हस्तांतरण आणि चेकबुकवर नवीन शुल्क लागू

August 16, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home