Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘आरएसएसचा काळा इतिहास पुसला जाणार नाही, कावळ्याने कितीही आंघोळ केली तरी तो बगळा होत नाही!’

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
August 13, 2023
in बातमी, राजकीय
0
जाती अंताशिवाय भारत जोडला जाणे अशक्य – ॲड. आंबेडकर
       

ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषदेत संघ-भाजपवर सडकून टीका

पुणे : ‘आरएसएस-भाजपने पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन साजरा केला आणि भारताच्या स्वातंत्र्य दिनावर शोक व्यक्त केला होता, काळा दिवस पाळला होता, त्यांनी भारतीय राष्ट्रध्वज आणि प्रतीक, आणि लोकशाही-धर्मनिरपेक्ष संविधानाला कठोरपणे नाकारले आणि त्याऐवजी विषमतावादी मनुस्मृतीची मागणी केली, जी ते आजही करत आहेत. हा काळा इतिहास पुसण्याचे काम सध्या सुरू आहे. पण कावळ्याने कितीही आंघोळ केली तरी तो बगळा होत नाही. संघाचा हा काळा इतिहास कधीच पुसला जाणार नाही.’ अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, ‘पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाला आनंदोत्सव साजरा करणाऱ्या आणि भारतीय स्वातंत्र्य दिनाला काळा दिवस म्हणून पाळणाऱ्या आरएसएस-भाजपने आता कितीही जूना इतिहास लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपवू शकणार नाहीत. नागपूरच्या बर्डी पोलीस स्टेशनमध्ये याची नोंद झालेली आहे. तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे संघाने लेखी माफीनामा दिलेला आहे. धर्माच्या नावाखाली समाजाला दुभंगण्याचे काम यांनी केले आहे आणि आताही करीत आहेत. सामान्य जनतेने यांना बळी पडू नये असे आवाहन आम्ही करीत आहोत.’

तसेच ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘हेगडेवार, गोळवलकर, सावरकर आणि गोडसे यांचे हे लोक आता स्वतंत्र, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही भारताच्या प्रतिकांचा वापर करत आहेत, ज्यांना त्यांनी नाकारले होते आणि आजही ते नाकारत आहेत. गोळवळकरांच्या We or Our Nationhood Defined या पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणाची आरएसएस-भाजपने जाहीर होळी करावी तरच आम्ही मान्य करू की ते बदलले आहेत,’ असेही आव्हान संघ भाजपला दिले. 

‘देशाचे गृहमंत्री अमित शाह म्हणतात की आम्ही स्वातंत्र्य नंतर जन्मलो, आम्ही तेव्हा नव्हतो तर माझ्या त्यांना एकच प्रश्न आहे की त्यांनी संघाची हाफ चड्डी घालून हिटलर सारखा नमस्कार केला की न केला हे जाहीर करावे, तुम्ही आधी तुमच्या काळ्या इतिहासातील चुका मान्य करा,’ असा टोला ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.

Whitewashing in progress but history never forgets!

RSS-BJP celebrated Pakistan’s Independence Day and mourned India’s Independence Day.
They vehemently rejected the Indian National Flag 🇮🇳 and Emblem, and the democratic-secular Constitution, and demanded the anti-egalitarian… pic.twitter.com/NqWyyIaXRO

— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 13, 2023

       
Tags: bjpPrakash Ambedkarrss
Previous Post

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग!

Next Post

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मार्मिक ट्विट!

Next Post
ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मार्मिक ट्विट!

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मार्मिक ट्विट!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
महानगरपालिका निवडणुकीत ‘गॅस सिलेंडर’ चिन्हावर मतदान करा; प्रकाश आंबेडकरांचे जनतेला आवाहन
बातमी

महानगरपालिका निवडणुकीत ‘गॅस सिलेंडर’ चिन्हावर मतदान करा; प्रकाश आंबेडकरांचे जनतेला आवाहन

by mosami kewat
January 14, 2026
0

मुंबई: महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकच्या प्रचाराची रणधुमाळी संपली. उद्या मतदान करण्याचा सोनेरी दिवस उगवणार आहे. वेगवेगळ्या भागातून नागरिक मतदान करून आपले...

Read moreDetails
नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; प्रकाश आंबेडकरांनी घेतली पाटोळे कुटुंबाची भेट

नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; प्रकाश आंबेडकरांनी घेतली पाटोळे कुटुंबाची भेट

January 14, 2026
वंचितची गर्जना! आंबेडकरी नेतृत्वाचा झंझावात; ४ ते १३ जानेवारीदरम्यान सभांचा महासंग्राम, जनसागरामुळे विरोधक हादरले

वंचितची गर्जना! आंबेडकरी नेतृत्वाचा झंझावात; ४ ते १३ जानेवारीदरम्यान सभांचा महासंग्राम, जनसागरामुळे विरोधक हादरले

January 14, 2026
नाशिकमध्ये खळबळ: वंचितच्या उमेदवाराच्या भावाला बेदम मारहाण; ‘प्रस्थापित’ घाबरल्याचा जिल्हाध्यक्षांचा आरोप

नाशिकमध्ये खळबळ: वंचितच्या उमेदवाराच्या भावाला बेदम मारहाण; ‘प्रस्थापित’ घाबरल्याचा जिल्हाध्यक्षांचा आरोप

January 14, 2026
वंचित-काँग्रेस युतीमुळे सत्ताधारी भयभीत? निवडणुकीच्या ४८ तास आधी पोलीस प्रशासनाकडून खच्चीकरणाचा प्रयत्न

वंचित-काँग्रेस युतीमुळे सत्ताधारी भयभीत? निवडणुकीच्या ४८ तास आधी पोलीस प्रशासनाकडून खच्चीकरणाचा प्रयत्न

January 14, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home