Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ओबीसींचे आरक्षण हिंदुत्ववादी पक्षानेच काढले – अॅड प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
October 20, 2022
in बातमी
0
ओबीसींचे आरक्षण हिंदुत्ववादी पक्षानेच काढले – अॅड प्रकाश आंबेडकर
       

जमावबंदी झुगारून ‘वंचित’चा मोर्चा थेट विधानभवन गेट समोर धडकला!

मुंबई : या देशात सवर्ण विरुद्ध ओबीसी असा परंपरेचा वाद चालत आलेला आहे. ओबीसी हा हिंदू असूनही तो केवळ संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे सत्तेचा वाटेकरी होवू पाहतो आहे. आणि म्हणून ज्या मार्गाने हा समूह सत्तेपर्यंत येवू पाहतो आहे तो मार्गच बंद करा, ही नीती भाजपा – आरएसएस या हिंदुत्ववादी पक्षाने आखली असल्याची प्रखर टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात ‘ओबीसी आरक्षणा’ संदर्भात मोर्चा काढण्यात आला होता. राज्य सरकारचा जमावबंदी आदेश झुगारून ओबीसी आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा थेट विधानभवन गेटवर धडकला. ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांनी विधानभवन परिसर घोषणांनी दणाणून सोडला.

अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेचा ठराव राज्य सरकारने विधानसभा अधिवेशनात मांडावा आणि तो ठराव केंद्र सरकारला आणि जनगणना आयोगास पाठवावा तसेच त्यासाठी लागणारा खर्च करायला राज्य सरकार तयार असल्याचे सांगावे जेणेकरून केंद्राला ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी लागेल आणि त्यातून आवश्यक असलेला इम्पीरिकल डेटा प्राप्त होईल’ . केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची मिलीभगत असून यांनी मिळून ओबीसी आरक्षण संपवण्याचा डाव आखल्याचा आरोप यावेळी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. ओबीसी समाजाचे आज राजकीय आरक्षण रद्द झालेले आहे. येत्या काळात ओबीसींचे नोकरीत आरक्षण, शैक्षणिक आरक्षण रद्द करण्याचा घाट सरकारने घेतला आहे. ओबीसी नेते म्हणवून घेणारे काही बोलायला तयार नाही हे आता ओबीसी समाजाच्या लक्षात यायला लागले आहे. आणि म्हणून मोर्चामध्ये ओबीसी समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला आहे.

महाराष्ट्र सरकारने कोणतेही कारण नसतांना १४४ कलम लावले. पोलीसांच्या आडून सरकारने मोर्चा दाबण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीची गळचेपी करणारी भूमिका सरकारची असली, तरी त्याला शह देवून आज हजारो कार्यकर्ते बाळासाहेब आंबेडकरांच्या हाकेला साद देत विधानभवनावर धडकले हा संविधानाचा विजय आहे. महाराष्ट्रातील ओबीसी या मोर्चाकडे आशेने पाहतो आहे. कारण ओबीसींच्या भवितव्याचा प्रश्न आज निर्माण झाला आहे. ओबीसी देशाच्या उद्योग व्यवस्थेचा कणा आहे. परंतु त्याच्या विकासासाठी गेल्या ७५ वर्षांमध्ये केंद्र आणि राज्य सरकार बजेट निर्माण करू शकले नाही. हे आंदोलन एक सुरूवात आहे. इथुन पुढे खरा संघर्ष सुरू होणार आहे.

रेखा ठाकूर, प्रदेशाध्यक्षा वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र

आंदोलनकर्त्यांची पोलीसांनी अडवणूक केली असली तरी आपल्या न्याय हक्कासाठी राज्यभरातील ओबीसी बांधव या मार्चामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात उभा राहीला आहे. प्रस्तापित पक्षांमधील ओबीसी नेते ओबीसींबाबत ठोस भूमिका घेतांना दिसत नाहीत. त्यामुळे राजकीय आरक्षणाबरोबर ओबीसींचे इतर आरक्षण रद्द होण्याची चिन्हे दिसत आहेत. ही भीती ओळखून ओबीसी समूह बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्त्वात लढा द्यायला सज्ज झाला आहे. हे आजच्या मोर्चाने सिद्ध केले आहे.

अबुल हसन खान, मुंबई अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी

ओबीसी आरक्षणासाठी जमावबंदी आदेश झुगारून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी विधानसभा अधिवेशनावर मोर्चा काढणार असल्याचे वंचितचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले होते. सकाळपासून मुंबईत येणाऱ्या वंचितच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली होती. विधानभवन परिसरात पोलीस बंदोबस्तात प्रचंड वाढ करण्यात आली होती. त्यामुळे वंचितचा मोर्चा विधानभवनापर्यंत पोहचण्या आधीच अडवला जाईल अशी रणनीती पोलिसांनी आखली होती. मात्र वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकत्यांनी गनिमी काव्याने हजारो कार्यकर्ते विधानभवन परिसरात आधीच विखरून उभे केले होते. अँड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांचे विधानभवन गेटवर आगमन होताच कार्यकत्यांनी एकत्र येत सरकार विरोधी घोषणाबाजी सुरू केली.

यावेळी प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, महिला आघाडी उपाध्यक्ष सविता मुंडे, प्रदेश उपाध्यक्ष नागोराव पांचाळ, किसन चव्हाण, अनिल जाधव, सर्वजित बनसोडे, गोविंद दळवी, सिद्धार्थ मोकळे, प्रदेश प्रवक्ते फारुख अहमद, प्रियदर्शी तेलंग, युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाकिर तांबोळी, उत्तर महाराष्ट्र महासचिव वामनराव गायकवाड, मुंबई प्रदेशाध्यक्ष अबुल हसन खान, महासचिव आनंद जाधव, संघटक विकास पवार आणि राज्यभरातून आलेले हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Tags: hindutvaobcPrakash AmbedkarreservationVanchit Bahujan Aaghadiआरक्षणहिंदुत्व
Previous Post

पुसदमध्ये वंचित बहुजन आघाडीचे आरोग्य शिबिर संपन्न; उपविभागीय अधिकाऱ्यांकडून कौतुक

Next Post

भूम तालुक्यातील शाखापूर ग्रामपंचायत सदस्यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश

Next Post
भूम तालुक्यातील शाखापूर ग्रामपंचायत सदस्यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश

भूम तालुक्यातील शाखापूर ग्रामपंचायत सदस्यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
एल आय सी आणि अदानी समूह
अर्थ विषयक

एल आय सी आणि अदानी समूह

by mosami kewat
October 28, 2025
0

आयुर्विमा महामंडळाने (एल आय सी) ने अदानी समूहातील कंपनीच्या रोख्यांमध्ये तब्बल ३४,००० कोटी पेक्षा जास्त गुंतवणुक केल्याची, वॉशिंग्टन पोस्टमधील बातमी...

Read moreDetails
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा परभणी (उत्तर) तर्फे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न‎‎

भारतीय बौद्ध महासभा जिल्हा परभणी (उत्तर) तर्फे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न‎‎

October 28, 2025
पुण्यात SRA विरोधी वंचित बहुजन आघाडीचा विराट धडक मोर्चा’ यशस्वी; प्रशासनाकडून सर्व मागण्या मान्य!

पुण्यात SRA विरोधी वंचित बहुजन आघाडीचा विराट धडक मोर्चा’ यशस्वी; प्रशासनाकडून सर्व मागण्या मान्य!

October 27, 2025
घाटकोपरमध्ये RSS च्या पथसंचलनावरून नवा वाद; आंबेडकरी कार्यकर्त्यांचे पंतनगर पोलिसांना पाच प्रश्न

घाटकोपरमध्ये RSS च्या पथसंचलनावरून नवा वाद; वंचित बहुजन आघाडीचे पोलिसांना प्रश्न

October 27, 2025
“नव”उदारमतवादात “जुन्या” उदारमतवादापेक्षा नवीन काय ?

“नव”उदारमतवादात “जुन्या” उदारमतवादापेक्षा नवीन काय ?

October 27, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home