यवतमाळ – वंचित बहुजन आघाडी पुसद तालुकाच्यावतीने विविध गावामध्ये विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी सावनकुमार उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाची प्रसंशा केली व प्रत्येक राजकीय पक्षाने अश्या सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले पाहिजे. जेणेकरुन ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हायला मदत होईल असे प्रतिपादन केले.
आरोग्य तपासणी शिबिराला डॉ. राहुल जाधव अस्थीरोग तज्ञ, सुधीर मारकड जनरल फिजिशियन व मेडिकेअर स्टाफ उपस्थित होता. या कार्यक्रमाला डी.के.दामोधर जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी, बुद्धरत्न भालेराव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भावसार साहेब,सरपंच रवींद्र महाले,बापुराव कांबळे पोलिस पाटील,जेनुल सिद्दीकी माजी जिल्हा परिषद सदस्य, मुनिर सिद्दीकी, दिपक पदमे, सचिन सूर्यवंशी, प्रदीप वाहुळे, माधव मनोहर, गौतम वाहुळे, विनोद बरडे, प्रसाद खंदारे, संघपाल कांबळे, दादासाहेब जोगदंडे, राहुल जोगदंडे, सावन मनवर, अविनाश जोगदंडे, भगवान कांबळे, सुभाष श्रावणे, श्रीकांत धबाले, माधव कांबळे, गुलाब वाहुळे, गौतम चौरे, कासम खान पठाण, शशांक खंदारे,प्रकाश खिलारे व गावातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.