अहमदनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवानी यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर केल्याची घोषणा केली. यावर अहमदनगर येथील पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की, पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद जिना यांच्या मजारवरती लालकृष्ण अडवाणी फुलं व्हायला गेले होते. तेव्हा त्यांना पक्षातून पदावरून काढून टाकण्यात आले होते.आरएसएस – बीजेपीने त्यांना त्यांच्यातून दोष मुक्त केलं आहे का? त्यांना दोष मुक्त न करता त्यांना भारतरत्न देणे म्हणजे एक मोठा फार्स आहे.
कालच्या बैठकीत किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यासाठी प्रत्येक पक्षाने तो मसुदा समजुन त्यावर पक्षाअंतर्गत चर्चा करावी. त्या मसुद्यात कोणते मुद्दे असतील त्याचा त्यात समावेश करून प्रत्येक पक्षाने 2-2 प्रतिनिधी नेमून कोणते मुद्दे समान आहेत आणि कोणते मुद्दे वेगवेगळे त्यावर चर्चा करावी आणि तो ड्राफ्ट कमिटीने फायनल करावा. अशी सूचनाही त्यांनी या पत्रकार परिषदेतून केली.
अहमदनगर जिल्ह्यातील भटक्या विमुक्त वडार समाजातील एका बारा वर्षे अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. पीडित परिवाराच्या कुटुंबाला सांत्वनपर भेट देण्यासाठी ॲड.प्रकाश आंबेडकर गेले होते.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण आणि पदाधिकारी उपस्थित होते.