‘वंचित’ च्या किमान समान कार्यक्रमात ‘मराठा’ आणि ‘ओबीसी’ आरक्षणाचा मुद्दा !
मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात अंतर्भूत करावयाचे मुद्दे ज्यांचा समावेश ‘किमान समान कार्यक्रम’ पत्रिकेत असावा यासाठीचा मसुदा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये राज्यात सुरु असणाऱ्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात लक्ष वेधले आहे.
सर्वप्रथम सद्यस्थितीत महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आराक्षणा संदर्भात मोठी आंदोलने सुरू आहेत त्यामुळे महाराष्ट्राचे सामाजिक व राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या संदर्भात आमची भूमिका सुरुवातीपासून सुस्पष्ट आहे की गरीब मराठ्यांचे आरक्षणाचे ताट आणि ओबीसी बांधवांचे आरक्षणाचे ताट वेगवेगळे असावे. अस्तित्वात असलेल्या ओबीसीआरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी आमची स्वच्छ भूमिका असल्याचे यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.