Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

घाटकोपरमध्ये RSS च्या पथसंचलनावरून नवा वाद; वंचित बहुजन आघाडीचे पोलिसांना प्रश्न

mosami kewat by mosami kewat
October 27, 2025
in बातमी
0
घाटकोपरमध्ये RSS च्या पथसंचलनावरून नवा वाद; आंबेडकरी कार्यकर्त्यांचे पंतनगर पोलिसांना पाच प्रश्न

घाटकोपरमध्ये RSS च्या पथसंचलनावरून नवा वाद; आंबेडकरी कार्यकर्त्यांचे पंतनगर पोलिसांना पाच प्रश्न

मुंबई : घाटकोपर येथील त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर नगर प्रवेशद्वार परिसरात २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) काढलेल्या पथसंचलनाच्या घटनेवरून आता नवा वाद उफाळून आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी काही धम्मबांधवांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती मिळाल्याने, वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे.

त्यांनी थेट पंतनगर पोलीस ठाण्यात जाऊन या संपूर्ण घटनेबद्दल ५ महत्त्वाच्या मुद्द्यांवर खुलासा करण्याची मागणी केली आहे. या पत्राद्वारे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर आणि आरएसएसला दिलेल्या कथित परवानगीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

१.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी काढलेल्या पथसंचलनासाठी पोलीस परवानगी घेतली होती का?

२. आरएसएसने परवानगीसाठी त्यांचे नोंदणीकृत प्रमाणपत्र सोबत दिले होते का? दिले असल्यास, त्याची एक प्रत उपलब्ध करून द्यावी.

३. जर आरएसएस ही नोंदणीकृत संघटना नाही, तर मग पोलीस ठाण्याने १७५ लोकांना ‘दांडूके घेऊन’ रस्त्यावर पथसंचालन करण्यासाठी कोणत्या आधारावर किंवा कुणाच्या शिफारशीने परवानगी दिली?

४.  जर आरएसएस नोंदणीकृत संघटना नाही, तर मग पंतनगर पोलीस ठाणे व महाराष्ट्र शासनाने त्यांना सुरक्षा पुरवण्यासाठी कोणते शुल्क आकारले होते की ही सुरक्षा मोफत देण्यात आली? मोफत दिली असल्यास, नागरिकांच्या कष्टाचा पैसा का खर्च करण्यात आला?

५. परवानगी नाकारल्यावर कारवाई : जर पंतनगर पोलीस ठाण्याने आरएसएसला परवानगी नाकारली होती आणि तरीसुद्धा १७५ लोकांनी दांडूके घेऊन पथसंचालन काढले, तर पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे का?

घाटकोपर माता रमाई आंबेडकर नगरमधील काही बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर हा खुलासा करण्याची मागणी करण्यात येत आहे.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष चेतन अहिरे, वंचित बहुजन महिला आघाडी मुंबई अध्यक्षा स्नेहल सोहनी, वंचित बहुजन युवा आघाडी मुंबई अध्यक्ष सागर गवई यांच्यासह अनेक जण उपस्थित होते

Tags: MaharashtramumbaiVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

“नव”उदारमतवादात “जुन्या” उदारमतवादापेक्षा नवीन काय ?

Next Post

पुण्यात SRA विरोधी वंचित बहुजन आघाडीचा विराट धडक मोर्चा’ यशस्वी; प्रशासनाकडून सर्व मागण्या मान्य!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
युवा समिती धनगर समाजाच्या युवकांचा वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा
बातमी

युवा समिती धनगर समाजाच्या युवकांचा वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा

by mosami kewat
November 16, 2025
0

अकोला : अकोला येथील सर्किट हाऊस येथे युवा समिती धनगर समाजाच्या वतीने गाव प्रमुखांची महत्वपूर्ण एल्गार बैठक पार पडली. समाजातील...

Read moreDetails
गजानन एकबोटे यांनी प्रा. दिलीप चव्हाण यांचा लेख चोरला?

गजानन एकबोटे यांनी प्रा. दिलीप चव्हाण यांचा लेख चोरला?

November 16, 2025
वर्धा हिंदी विद्यापीठात बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यास मनाई; RSS शाखेला मात्र परवानगी!

वर्धा हिंदी विद्यापीठात बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यास मनाई; RSS शाखेला मात्र परवानगी!

November 16, 2025
बुलढाण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडी–काँग्रेसची युती; ५०-५० जागावाटप निश्चित

बुलढाण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडी–काँग्रेसची युती; ५०-५० जागावाटप निश्चित

November 16, 2025
ठाण्यात २.२५ कोटींचे ड्रग्ज जप्त! मध्यप्रदेशातून आलेल्या ४ तस्करांना अटक

ठाण्यात २.२५ कोटींचे ड्रग्ज जप्त! मध्यप्रदेशातून आलेल्या ४ तस्करांना अटक

November 16, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home