मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नावाने एक बनावट टेलिग्राम अकाउंट तयार करून त्याद्वारे फसव्या लिंक्स पाठवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या लिंक्सवर क्लिक केल्यास मोबाईल हॅक होण्याचा गंभीर धोका असल्याने, स्वतः ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नागरिकांना याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे.
काही अज्ञात व्यक्तींनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासारखेच नाव आणि प्रोफाइल वापरून एक फेक टेलिग्राम अकाउंट तयार केले आहे. या अकाउंटवरून विविध लोकांना एक संशयास्पद लिंक पाठवली जात आहे. ही लिंक उघडल्यास वापरकर्त्यांचा मोबाईल फोन हॅक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या याबाबत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नावाने एक फेक टेलिग्राम अकाउंट तयार करून त्याद्वारे लिंक पाठवली जात आहे. तरी कृपया, कोणीही ती लिंक उघडू नये. ती लिंक उघडल्यास तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो.
नागरिकांनी अशा कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, तसेच ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नावाने आलेल्या कोणत्याही अज्ञात टेलिग्राम मेसेजबाबत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
तुमच्या आया- बहिणींचं सीसीटीव्ही फुटेज बाहेर देने कितपत योग्य आहे? ही कसली भाषा आहे?
राजेंद्र पातोडे निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मतदारांचे सीसीटीव्ही फुटेज प्रसारित करण्यासंदर्भातील प्रश्नावर प्रतिक्रिया दिली. 'तुमच्या आया- बहिणींचं...
Read moreDetails