औरंगाबाद : निवडणुकीच्या रणधुमाळीत आता ऑडिओ क्लिपच्या राजकारणाने वातावरण तापले आहे. भाजप आमदार नारायण कुचे यांची एक ऑडिओ क्लिप सध्या सर्वत्र व्हायरल होत असून, यामध्ये पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप करण्याबाबत चर्चा होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नेमकं काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये?
व्हायरल झालेल्या या संवादामध्ये नारायण कुचे आणि एका कार्यकर्त्यामध्ये पैशांच्या वाटपावरून चर्चा सुरू असल्याचे ऐकायला मिळते.
ऑडिओमध्ये समोरची व्यक्ती आमदारांना सल्ला देताना म्हणते, “आता नको, थोडा अंधार पडू द्या, मग पैसे वाटप करू.”धक्कादायक बाब म्हणजे, “पोलीस बंदोबस्तात पैसे वाटतो,” असे उत्तर समोरच्या व्यक्तीने कुचेंना दिल्याचे या क्लिपमध्ये रेकॉर्ड झाले आहे.
या ऑडिओ क्लिपमुळे औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस संरक्षणात पैशांचे वाटप करण्याचा उल्लेख असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. जर ही क्लिप खरी असेल, तर हा आचारसंहितेचा मोठा भंग असल्याचे बोलले जात आहे.
औरंगाबाद मनपा निवडणुकीत वंच बहुजन आघाडीच्या उमेदवारा विरोधात भाजप आमदार नारायण कुचे यांची बहीण निवडणुकीला उभी होती. वंचितच्या उमेदवारांना विजयी घोषित केल्यानंतर आमदार कुचे ने दबाव टाकून वंचितच्या विजयी उमेदवारांना पराभूत केल्याचा आरोप वंचितच्या उमेदवारांनी केला आहे.
व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा
https://www.facebook.com/share/v/1AfxhNP8af





