Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पालीभाषा परिसंवादात डॉ. संभाजी गावडे यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती शिक्षक प्रतिमा पुरस्कार’

mosami kewat by mosami kewat
March 16, 2026
in बातमी, सामाजिक
0
पालीभाषा परिसंवादात डॉ. संभाजी गावडे यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती शिक्षक प्रतिमा पुरस्कार’
       

सातारा : लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान, पुणे आणि रयत शिक्षण संस्थेचे मंगला रामचंद्र जगताप महाविद्यालय, उंब्रज यांच्या संयुक्त विद्यमाने पालीभाषा परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संभाजी गावडे यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती शिक्षक प्रतिभा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथील मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. तुकाराम रोगटे होते. यावेळी अ‍ॅड. सुगंध वाघमारे आणि अ‍ॅड. आनंदा कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात डॉ. तुकाराम रोगटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आपण ज्या दिशेने जीवनाची वाटचाल करणार आहोत ती दिशा आपल्या परिसरातच ठरवली पाहिजे आणि त्या दिशेने सातत्याने प्रयत्नपूर्वक वाटचाल केली पाहिजे.

सत्कारमूर्ती डॉ. संभाजी गावडे यांनी आपल्या मनोगतात शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा दिला. तसेच लोकशिक्षक बाबा भारती यांच्या कार्याविषयी आणि त्यांच्या साहित्यिक योगदानाविषयी अ‍ॅड. आनंदा कांबळे यांनी सविस्तर माहिती दिली. तर डॉ सुगंध वाघमारे यांनी पाली भाषा आणि तिचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मंदाकिनी वर्णेकर यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा. विकास बर्गे यांनी करून दिली, तर आभार प्रदर्शन डॉ.  दिगंबर भोंगे यांनी केले. हा कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट, शिस्तबद्ध व देखणा वातावरणात पार पडला. यावेळी इस्लामपूर येथील बाबां अंतू कांबळे, प्रकाश कांबळे, अप्पा देशमुख, विजय कांबळे यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


       
Tags: EducationMaharashtrapaliPali languageSataraUniversityVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

मोदी – एपस्टीन प्रकरणावर स्पष्टीकरणाची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे सोलापुरात निदर्शने

Next Post

गॅस तुटवडा व महागाईविरोधात कर्जत तहसीलसमोर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

Next Post
गॅस तुटवडा व महागाईविरोधात कर्जत तहसीलसमोर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

गॅस तुटवडा व महागाईविरोधात कर्जत तहसीलसमोर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का - ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का – ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
April 5, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देशाच्या संरक्षण धोरणाबाबत गंभीर मुद्दे उपस्थित करत केंद्र सरकारवर...

Read moreDetails
नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

April 5, 2026
दौंड: एसआरपीएफ मैदानावर भरती प्रक्रियेत उमेदवाराचे अनियंत्रित वर्तन; शॉर्टकट बेतला जीवावर! 

दौंड: एसआरपीएफ मैदानावर भरती प्रक्रियेत उमेदवाराचे अनियंत्रित वर्तन; शॉर्टकट बेतला जीवावर! 

April 4, 2026
Koregaon Park : कोरेगाव पार्कमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह गायब; नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी

Koregaon Park : कोरेगाव पार्कमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह गायब; नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी

April 4, 2026
सवंग प्रसिद्धीची 'बेडूक उडी'!

सवंग प्रसिद्धीची ‘बेडूक उडी’!

April 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home