जालना : भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या ॲसिड हल्ल्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी अखेर पीडित महिला शीला संदीप भालेराव यांची भेट घेतली आहे.
डॉ. पाटील यांनी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात जाऊन शीला भालेराव यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी डॉ. राजेंद्र पाटील यांच्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा वानखेडे, डॉ. कासोद, डॉ. दीपक सोन्नी उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विशाल मिसाळ, नितीन जोगदंडे, उपस्थित होते.
निफाड तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची भव्य आढावा बैठक यशस्वीरीत्या पार पडली
नाशिक : वंचित बहुजन आघाडीची जि. नाशिक ता. निफाडची आढावा बैठक पिंपळगाव बसवंत येथील रुचा हॉटेल येथे जिल्हाध्यक्ष चेतनभाऊ गांगुर्डे...
Read moreDetails