प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करुन दिली माहिती
अकोला : सध्या देशभरात निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. अशातच कोण कुठल्या पक्षता जाणार याविषयी कुठेच स्पष्टता दिसत नाही. मात्र, माध्यमांमध्ये फेक बातम्यांचे सत्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करुन माहिती दिली आहे. आंबेडकर ट्वीटमध्ये म्हटले आहे की, अशा मनघडत गोष्टी मनोरंजनासाठी बनवल्या आणि सांगितल्या जातात. अशा खोट्या, मनघडत गोष्टींवर विश्वास ठेवू नका.
माध्यमांनी असे म्हटले होते की, ॲड. प्रकाश आंबेडकर आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यात फोनद्वारे चर्चा झाली आहे. या चर्चेमध्ये केसीआर यांनी राज्यात वंचितसोबत निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसा प्रस्ताव घेऊन भारत राष्ट्र समितीच्या मराठवाड्यातील नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या अकोल्यातील यशवंत भवन येथे ही भेट झाली असल्याची ही बातमी माध्यमांवर फिरत होती. त्याला उत्तर देताना आंबेडकर म्हटले आहे की, अशा खोट्या, मनघडत कहाण्यांवर विश्वास ठेवू नका.