धुळे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी धुळे शहरात उद्या (ता. ३१) भव्य बाईक रॅली आणि अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
सकाळी ११ वाजता धुळे शहरातून बाईक रॅलीला सुरुवात होईल. ही रॅली किल्ले लळींग येथील लांडोर बंगल्यापर्यंत जाईल, जिथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याची आठवण करून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘नरेंदर, कब मिलेंगा गॅस सिलेंडर?’ गॅस टंचाईविरोधात आज राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या गॅस सिलेंडरच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर आज, ६ एप्रिल २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन...
Read moreDetails






